Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. शोक प्रस्तावानंतर दिवसभरासाठी विधानसभा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटकात कलम १४४ लावण्यात आले आहे.
त्याचबरोबर, कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच महाराष्ट्राच्या नेत्यांना कर्नाटकात येण्यापासून अटकाव केला आहे. त्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात ( Maharashtra ) उमटले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनातदेखील यावर चर्चा झाली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. झालेल्या प्रकाराबद्दल कर्नाटक ( Karnatak )च्या मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी असा निरोप कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना देऊ असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, सीमेशेजारील गावांचा विकास झालेला नाही. त्यामुळे अशी गावे शेजारील राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. सीमेशेजारील राज्यांचा विकास करु असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सीमाप्रश्नावरुन सत्ताधारी आणि विरोधी गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार ( Ajit Pawar )यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. अजित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या प्रयत्नांची गृहमंत्री अमित शहांनी दखल घेतली असल्याचे म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.