Maharashtra: सीमाप्रश्न, उद्योग, महापुरूषांचा अपमान मुद्यांवरून महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन गाजणार

महाराष्ट्रातील नवीन सरकारला जवळपास सहा महिने पूर्ण होत आहेत.
Maharashtra Winter Assembly Session
Maharashtra Winter Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये (Maharashtra Winter Assembly Session) सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे हे दुसरे अधिवेशन आहे. नवीन सरकारला जवळपास सहा महिने पूर्ण होत आहेत. अशात राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, सतत होणारा महापुरूषांचा अपमान हे मुद्दे हिवाळी अधिवेशनात गाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी नेहमीप्रमाणं बहिष्कार घातला आहे.

(Maharashtra Winter Assembly Session to start from 19 December at Nagpur)

Maharashtra Winter Assembly Session
Pakistan Terror Attack: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशनापूर्वी आज दुपारी विरोधी पक्षाची पत्रकार परिषद पार पडली. यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं. हे अधिवेशन तीन आठवड्याचं घ्यावं अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत, असा आरोप विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले.

Maharashtra Winter Assembly Session
Goa Libration: नाहीतर 'गोवा' आज एक स्वतंत्र 'देश' असता; ती एक भेट झाली नाही अन्...

आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. 865 गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न 62 वर्षात कधीही झाला नव्हता. असे अजित पवार यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com