मुंबईत पावसामुळे वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनेने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईत पावसामुळे 25 जणांचा मृत्यू

मुंबईत (Mumbai) पावसामुळे (Rain) वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनेने 15 जणांचा मृत्यू झाला आहे, सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 1323.91 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक भागात (many parts of the state) पावसाची (Rain) जोरदार बॅटींग (Batting) सुरु आहे. मुंबईला काल रात्रीपासून पावसाने झोडपून काढले असून सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सध्या काहीवेळापासून पावसाने उसंत घेतली असली तरी नागरीकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईतील भांडुपमध्ये वनविभागाची भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये एका 16 वर्षीय मुलाच्या मृत्यू झाला आहे.

भांडुप परिसरात रात्री घडलेल्या घटनेमुळे येथील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे ही भिंत खचली आणि अमरकोर शाळेजवळ असलेल्या घरांवर ही भिंत कोसळली. मुंबईत मिठीनदीने धोक्याची पातळी ओलंडली असून, नदीचे पाळी पात्राच्या बाहेर आले आहे. मुंबईत पावसामुळे वेगवेगळ्या भागात घडलेल्या घटनेने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये घराचे छत कोसळून 17 जणांना आपले प्रण गमवावे लागले आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे.

कोकणाला पुढील 2 दिवस रेड अलर्ट

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. येथे पडणाऱ्या सततच्या पावसाने कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी या भागात पावसामुळे पाणी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1323.91 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. उत्तर भागात पावसाच्या सरी बरसत असून, संगमेश्वरजवळील बाजारपेठेत पाणी शिरले आहे. पुढील 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाने बळीराजासह सर्व जण सुखावले असून, शेतीच्या कामाला आता वेग आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाची हजेरी

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परंतू पुण्यात मात्र पावसाची अद्याप प्रतिक्षाच करावी लागत आहे.

मराठवाड्यात देखील बीड, उस्मानाबाद, नांदेड या भागात चांगला पाऊस सुरु आहे. तर बुलढाणा, अकोला भागात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Blast: प्रेमात धोका, एक्स-बॉयफ्रेंडकडून बदला! दिल्ली ब्लास्ट आणि 'डॉक्टरांच्या' कटाच्या पर्दाफाशाचा ओमर अब्दुल्लांनी केला खुलासा

Wild Boar Attack: बेंदुर्डे येथे रानडुकराच्या हल्ल्यात 59 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, काजू बागायतीत गेला होता सफाईसाठी

10 चौकार, 9 षटकार... 44 चेंडूत ठोकलं शतक! हार्दिक पांड्याचा 'हा' सहकारी खेळाडू रातोरात बनला स्टार; पदार्पण सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड

Panjim Fire: सेरेंडिपीटी महोत्सवाच्या सेटला लागली आग, कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, पणजीत टळली मोठी दुर्घटना; Watch Video

Viral Video: शाळेच्या भिंतीवरुन उडी मारुन शेडवर उतरले, पण खाली पाहतो तर काय... क्लास बंक करणं पठ्ठ्याला पडलं महागात; पोरीनं काढला पळ

SCROLL FOR NEXT