पणजी: मागील काहिदिवसांपासून गोव्याला (Goa) पावसाने (Monsoon) चांगलेच झोडपले असून, राज्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे. कोकणच्या (Konkan) किनारपट्टी भागात देखील पावसाची (rain) जोरदार बॅटींग सुरु असल्याने तेथील रस्तांना नद्यांचे स्वरुप आले आहे. रविवारी गोव्यासह कोकणातही हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' ('Red Alert' from IMD) देण्यात आला आहे. गोव्यासह कोकणच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आरबी समुद्रात आणि आंध्रच्या किनारपट्टीवर झालेल्या वातावरणातील बदलामुळे गोव्यात मागिल दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. मागिल 24 तासांत 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज 150 ते 200 मिलीमिटर पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
गोव्यात सुरु असलेल्या सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पणजी, मडगाव, सांगे, काणकोण आदी भागात जोरदार पाऊस पडत आहे. गोवा-महाराष्ट्राच्या हद्दीवर असणाऱ्या पेडणे भागात सर्वाधिक म्हणजे 190 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. गोव्यात आत्तापर्यंत एकूण 1740 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 170 मिलिमीटर जास्त पावसाची नोंद गोव्यात करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.