Heavy rains expected in Central Maharashtra including Konkan in next 24 hours Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकणासह मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा पडण्याची शक्यता दर्शवली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात पावसाचा (Rain) जोर सध्या कमी झाला आहे. यामुळेच पुर (Flood) आलेल्या भागातील पाणी आता कमी होत असल्याचे दिसत आहे. परंतु हवामान खात्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस (Rain) पडण्याचा पडण्याची शक्यता दर्शवली आहे.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणसह विदर्भातसुद्धा पावसाची नोंद करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्यांची परिस्थिति निर्माण झाली आहे. येत्या 24 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होईल. यामुळे दक्षिण तसेच उत्तर प्रदेश भागात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिति निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळेच पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे. पुणे, सातारा यासारख्या जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला होता परंतु पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. तसेच पुढील चार दिवस रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.

दरम्यान , गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान सुरूच होता. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला तर पावसाने जायबंदी केले होते. रायगडमध्ये पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळून तर सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पूराचा फटका बसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी तर झालीच अनेकांना या घटनेमध्ये आपला जीव गमवला आहे.या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोदी सरकारने राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली असून पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 700 कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे याच दरम्यान महाराष्ट्रावर पावसाचे संकट ओढवले आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले की मोदी सरकार यातून सावरण्यासाठी या दुर्घटनाग्रस्त लोकांना काय मदत देईल अशातच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT