बेकायदेशीर बांधकामाचा अहवाल द्या, मीराबाग आंदोलकांची मागणी; जलसंपदा कार्यालयावर नेला मोर्चा

Mirabag Bandhara Protest Goa: मीराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधातील आंदोलनाने शुक्रवारी १८वा दिवस गाठला.
Mirabag Bandhara Protest Goa
Mirabag Bandhara Protest GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: मीराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधातील आंदोलनाने शुक्रवारी १८वा दिवस गाठला. संतप्त ग्रामस्थांनी पाजीमळ, सांगे येथील जलसंपदा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून बेकायदेशीर बांधकामाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याची मागणी केली.

दोन वर्षांपूर्वी खोदलेला खड्डा तसेच सध्या सुरू असलेले नवीन खोदकाम त्वरित बुजविण्याची मागणीही त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. अखेर लेखी हमी मिळाल्यानंतर आंदोलक माघारी परतले.

Mirabag Bandhara Protest Goa
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

काय म्हणाले आंदोलक..

आंदोलनाचे नेते संकेत भंडारी म्हणाले, सरकारने बंधारा रद्द केल्याचे लेखी स्वरूपात देणे भाग आहे. आम्ही माघार घेणार नाही. नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी सांगितले, मीराबाग येथे बंधारा उभारल्यास सांगेतील देव श्री संगमेश्वर मंदिर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com