Arvind Kejriwal Liquor Scam: पणजीत 'आप'चा आनंदोत्सव, मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर जल्लोष

Liquor Scam: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेते मनिष सिसोदिया यांची मद्य धोरण घोटाळ्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
Arvind Kejriwal Liquor Scam
Arvind Kejriwal Liquor ScamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि वरिष्ठ नेते मनिष सिसोदिया यांची मद्य धोरण घोटाळ्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या नेत्यांच्या मुक्ततेचा आनंद गोव्यातील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप आणि केजरीवाल यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

कार्यालयाच्या बाहेर प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले, ‘आप’चे वरिष्ठ नेते अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याविरोधात राऊज एव्हेन्यू कोर्टात सीबीआय आणि ईडीच्यावतीने कथित मद्य घोटाळा दोन वर्षे खटला चालू होता.

या न्यायालयाने निकाल दिला पक्षाचे नेते केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता केली आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यालयात आमच्या नेत्यांविरोधात घडवून आणलेला हा कट होता. दिल्लीत दहा वर्षे ‘आप’ सरकारने चांगले काम केले, ते सरकार घालवण्यासाठी भाजपने कशापद्धतीने कट कारस्थान केले ते सर्वांनी पाहिले. कथित मद्य घोटाळा प्रकरणात पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात जावे लागले.

Arvind Kejriwal Liquor Scam
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

ते पुढे म्हणाले, भाजपने सिसोदिया यांना तीस आमदार घेऊन सोबत यावे, तुम्हाला मुख्यमंत्री करतो, अशी ऑफर दिली. त्यांनी ती ऑफर धुडकावली. त्यांना दोन वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले. मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगात घालण्यात आले. त्यांना मधुमेहाचा आजार असताना त्यांना इंजेक्शनही देण्याला भाजपने विरोध केला. अखेर न्यायालयाकडून ती परवानगी आणावी लागली. पक्षाने न्यायालयीन लढाई लढली, अखेर न्यायालयाने न्याय दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Arvind Kejriwal Liquor Scam
Goa Weather Update: राज्यात तापमानाचा पारा 33.6 अंशांवर, काही भागात पहाटे थंडी

आमच्यात फूट पाडण्याचा झाला प्रयत्न!

आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी आरोप केला की, भाजपने त्यांना आणि आमदार क्रूझ सिल्वा यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर भाजपमध्ये सामील होण्यासाठी दबाव आणला. त्यांची ही चाल अयशस्वी झाली. आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ. भविष्याबद्दल विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, पक्षाचा पुढचा मार्ग उज्ज्वल आहे आणि २०२७ मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. दरम्यान, संदेश तेलेकर यांनीही आपले मत मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com