Maharashtra Floods: पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून 700 कोटींची मदत

याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली

Maharashtra Floods  central government provides Rs 700 crore to flood affected farmers
Maharashtra Floods central government provides Rs 700 crore to flood affected farmersDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला तर पावसाने जायबंदी केले आहे.रायगडमध्ये पावसाने अनेक ठिकाणी दरडी कोसळून तर सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पूराचा फटका बसून मोठ्या प्रमाणात वित्तहानी तर झालीच अनेकांना या घटनेमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोदी सरकारने राज्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली असून पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे याच दरम्यान महाराष्ट्रावर पावसाचे संकट ओढवले आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले की मोदी सरकार यातून सावरण्यासाठी या दुर्घटनाग्रस्त लोकांना काय मदत देईल अशातच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.


Maharashtra Floods  central government provides Rs 700 crore to flood affected farmers
'NDRFच्या धरतीवर प्रत्येक जिल्ह्यात SDRF उभे करणार' - मुख्यमंत्री

यापूर्वी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान आवास योजनेतून सर्वांना घरे बांधून देणार असल्याचे सांगितले होते. आणि केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी आहे असे देखील राणेंनी यावेळी सांगितले होते.

दरम्यान राज्याचे मुख्यमंती उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वांना भरपाई देणार असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली आहे. तसेच दोन दिवसात संपूर्ण आढावा घेऊन योग्य मदत जाहीर करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते .तसेच मदत करताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com