Police Transfer: आठ पोलिस अधीक्षक, तर तीन 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या; संतोष देसाई दक्षिण गोवा 'एसपी'

Goa Police Transfer: राज्य प्रशासनाने गोवा पोलिस दलातील वरिष्ठ श्रेणीतील सात पोलिस अधीक्षकांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.
Police Transfer
Police TransferDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य प्रशासनाने गोवा पोलिस दलातील वरिष्ठ श्रेणीतील सात पोलिस अधीक्षकांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. राज्यपालांच्या मान्यतेने हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.

नव्या नियुक्तीनुसार, वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संतोष देसाई यांची नियुक्ती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे ‘कुशावती’ जिल्ह्याचा अतिरिक्त ताबाही देण्यात आला आहे.

Police Transfer
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

यापूर्वी किनारी सुरक्षा विभागाचे अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांची आता पोलिस अधीक्षक (वायरलेस) म्हणून बदली झाली आहे.नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तुषार वेर्णेकर यांची पोलिस मुख्यालय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते पुढील आदेशापर्यंत मुख्यमंत्री सुरक्षा विभागाचे डीएसपीपदीही राहतील.

Police Transfer
Shigmo Festival Goa: काणकोणात पारंपरिक शिमगोत्सवास दिमाखात प्रारंभ, लोलयेतील सहा मेळांकडून जल्लोष; माजाळी येथील कलाकारांवर मेळांची भिस्त

तसेच, राजन निगळ्ये यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. इतर नियुक्त्यांत राजेश कुमार यांची किनारी सुरक्षा, जिवबा दळवी यांची मोटार परिवहन, तर नूतन वेरेंकर यांची मानवी तस्करी विरोधी विभाग आणि ‘पिंक फोर्स’च्या एसपीपदी नियुक्ती झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com