"जसे देशात एक पप्पू आहेत त्यांना जे वाटते तस ते बोलतात तसेच नाना पटोले हे राज्यातील पप्पू आहेत" अशी खोचक टीका भाजपचे(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वीच केंद्रात मोदी मंत्रिमंडळाचा फेरबदल झाला आणि या फेरबदलावर काँगेसकडून(Congress) जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनीही 'मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधान बदलायला हवेत,' असे म्हणत नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली होती . पटोले यांच्या या विधानाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर, नाना पटोले यांना चंद्रकांत पाटलांनी थेट पप्पू असं म्हटल्यानं राज्याच्या राजकारणात आता नवे वादळ उठणार हे नक्की.
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारत नव्याने निर्माण झालेले सहकार खाते अमित शहा यांच्याकडे देण्यात आले आहे. हे खाते जसे त्यांच्याकडे गेले तसेच राज्यासह देशात अनेक वावड्यांनीं जोर पकडला राज्यात काँग्रेस आणि राष्टवादीला शह देण्यासाठी हे खाते अमित शाह यांच्याकडे देण्यात आले असल्याचे बोलले गेले अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर शंका व्यक्त केली होती त्यांच्या याच शंकेला उत्तर देताना संजय राऊतांना सहकारातल काय कळते असा सवालही चंद्रकांत पाटलांनी विचारला आहे.
साखर कारखान्यासाठी किती भांडवल लागतं. नफ्यातून कारखाना काय करु शकतो याची माहिती त्यांना आहे का असा प्रश्न विचारात . सहकार कशाला म्हणतात हेही राऊतांना माहिती नाही. सहकार खाते अमित शहांकडे गेले त्यामुळे विरोधक धास्तावले आहे, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
एकूणच काय तर पुण्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विरोधकांना जोरदार फैलावर घेत टीकास्त्र सोडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.