हे तर 'रामभरोसे राज्य': रुपाली चाकणकरांचा योगी सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Rupali Chakankar attacks on up government for Lakhimpur women attack
Rupali Chakankar attacks on up government for Lakhimpur women attackTwwiter@Rupali Chakankar
Published on
Updated on

उत्तर प्रदेशमध्ये(Uttar Pradesh) घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेवरून शुक्रवारपासून उत्तर प्रदेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांच्या भाजपा(BJP) सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका सुरु केली आहे.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनीही उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या एका महिला उमेदवाराची साडी खेचण्याचा प्रकार घडला आहे याचमुळे रुपाली चाकणकर यांनी संतापत , "ज्याला लोक "रामराज्य" समजतात ते खरं तर "रामभरोसे" राज्य आहे. रामभरोसे राज्यात असलेल्या आंधळ्या सरकारमुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही. सीतेची ही हतबलता तिथे रोजचीच आहे."असा जोरदार प्रहार सरकारवर केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या स्थानिक निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांसाठी लखीमपुर खीरीच्या पसगवा ब्लॉकमध्ये समाजवादी पक्षाच्या एक महिला उमेदवाराची प्रस्तावक म्हणून एक महिला कार्यकर्ती शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेल्या होत्या मात्र तिथेच त्यांचा वाद दुसऱ्या उमेदवारासोबत झाला आणि हा वाद वाढतच गेला दरम्यान संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, तसेच त्यांची साडी खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न केल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून केला जात आहे.

नेमके याच प्रकारामुळे उत्तर प्रदेशमध्ये महिला सुरक्षित कशा वारंवार राज्यात महिला अत्याचार होतात मग सरकार करतंय तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांचा भडीमार विरोधकांकडून योगी सरकारवर केला जात आहे.

Rupali Chakankar attacks on up government for Lakhimpur women attack
भाजपा आणि सापामध्ये आज पुन्हा राडा

तर राज्याच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही सरकारवर शरसंधान साधत “उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारमध्ये कायदा नाही तर जंगलराज सुरु आहे. लखीमपुर खेरी येथील महिलेशी केलेले गैरवर्तन अत्यंत लज्जास्पद आहे.” अशी टीका केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com