CM Pramod Sawant Dainik Gomantak
महाराष्ट्र

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंतांचा महाराष्ट्र दौरा; स्वामी समर्थांचे घेतले सपत्नीक दर्शन; जनतेच्या कल्याणाची केली प्रार्थना !

Chief Minister Pramod Sawant Visit Maharashtra: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत सपत्नीक अक्कलकोटला पोहोचले. यावेळी त्यांच्याबरोबर महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी देखील आहेत. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी स्वामी समर्थांच्या चरणी जनतेचे कल्याण, सुख, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना केली. आता यापुढे विधानसभा निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री सावंत महाराष्ट्रात प्रचारसभा घेतानाही दिसणार आहेत. खासकरुन कोकण पट्ट्यात मुख्यमंत्री सावंत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसतील.

स्टार प्रचारक

दरम्यान, विधानभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी, भाजपकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या 40 स्टार प्रचारकांमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही नाव होते.

दिवाळीनंतर पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात सभा

पंतप्रधान मोदी दिवाळीनंतर महाराष्ट्रात भव्य सभा घेण्याची तयारी करत आहेत. 5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान पीएम मोदी महायुतीसाठी मते मागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 8 दिवस महाराष्ट्रात अनेक निवडणूक सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी केवळ भाजपचाच (BJP) नव्हे तर महायुतीच्या उमेदवारांचाही प्रचार करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांना उतरवलं निवडणुकीच्या मैदानात

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT