Maharashtra Police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra: महाराष्ट्रात घातपात करण्याचा त्यांचा डाव होता, अंबानी स्कूलही बॉम्बने उडवण्याची धमकी

महाराष्ट्रात घातपाताचा कट रचला जात असल्याची कबुली अटक झालेल्या या दहशतवाद्यांनी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Maharashtra Police: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी (ATS) पंजाबस्थित गुंड सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना ठाण्यातून अटक केली. पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एटीएसने रविवारी संध्याकाळी ठाण्यातील कल्याण येथून तीन आरोपींना अटक केली.

तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंदाच्या संपर्कात होते. दरम्यान, महाराष्ट्रात घातपाताचा कट रचला जात असल्याची कबुली अटक झालेल्या या दहशतवाद्यांनी दिली आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

धीरुभाई अंबानी स्कूल बॉम्बने उडवण्याची धमकी

एका अज्ञात कॉलद्वारे मुंबईमधील (Mumbai) धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला (Dheerubhai Ambani International School, Mumabi) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजता सुमारास शाळेच्या लँडलाईनवर पोलिसांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने शाळेत टाईम बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर कॉल लगेच डिस्कनेक्ट झाला. दरम्यान, फोन करून धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु आहे. तसेच, मुंबई पोलिस देखील सतर्क झाले आहेत.

दरम्यान, , पंजाब पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करत ATS अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आंबिवलीच्या NRC कॉलनीत सापळा रचला होता.

यावेळी गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंदाच्या संपर्कात असणाऱ्या शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमरदीप कुमार यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौकशीदरम्यान, त्यांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ निर्माण झाली असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT