Maharashtra ATS: पंजाबचा गँगस्टर सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना अटक, एटीएसची कारवाई

तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्या संपर्कात होते.
Maharashtra ATS
Maharashtra ATSDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पंजाबस्थित गुंड सोनू खत्रीच्या तीन साथीदारांना ठाण्यातून अटक केली आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्स (एजीटीएफ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत एटीएसने रविवारी संध्याकाळी ठाण्यातील कल्याण येथून तीन आरोपींना अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. तिघेही गुंड-दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंडा याच्या संपर्कात होते.

Maharashtra ATS
Punjab Crime: आधी पत्नीची हत्या, नंतर स्वत:वर गोळी झाडली; लष्करी अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

शिवम सिंग, गुरुमुख सिंग आणि अमरदीप कुमार अशी तीन आरोपींची नावे आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे कारवाई करत ATS अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आंबिवलीच्या NRC कॉलनीत सापळा रचला होता. कालाचौकी आणि विक्रोळी युनिटमधील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिस आणि पंजाब पोलिसांच्या मदतीने यादव नगर येथून आरोपींना अटक केले. तिघांवरही खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, स्फोटके असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Maharashtra ATS
Malaika Arora Video: हात तर मिळवा! उंचीने लहान असलेल्या व्यक्तीने मलायकाला केली अजब विनंती

पंजाब पोलीस अनेक दिवसांपासून या गुन्हेगारांचा शोध घेत होते, परंतु त्यांचे ठिकाण सापडत नव्हते. यानंतर त्यांना पकडण्याची जबाबदारी पंजाब अँटी गँगस्टर टास्कर फोर्सकडे सोपवण्यात आली. हे तिन्ही आरोपी पंजाबमधील माखन सिंग हत्याकांडात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिन्ही आरोपी पंजाबचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे आरोपींना पंजाब पोलिस न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिन्ही गुन्हेगार बब्बर खालसा प्रमुख हरविंदर सिंग रिंडा आणि सोनू खत्री टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनीही नवांशहरमध्ये माखन सिंगची हत्या करून पळ काढला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com