Konkan Ganpati Special Bus Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

Ganeshotsav 2025 Konkan Bus Service: कोकणातल्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! येत्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तब्बल ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

5000 Extra Buses To Konkan For Festival Travelers

मुंबई: कोकणातल्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तब्बल ५००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कोकणात धावणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयात पार पडलेल्या गणपती उत्सवाच्या वाहतूक नियोजन बैठकीनंतर सरनाईक म्हणाले, "गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचं अतूट नातं आहे. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी हा सण विशेष आहे, त्यामुळे नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी दरवर्षी गणेशोत्सवासाठी जादा बसेस चालवते. यंदाही आम्ही ५००० अतिरिक्त गाड्या कोकणात पाठवत आहोत."

या बैठकीला एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी तब्बल ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. या विशेष बस सेवेला राज्यभरातील भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लाखो वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला.

या यशस्वी व्यवस्थापनाच्या अनुभवातून एसटीने आता आगामी गणेशोत्सवासाठीही ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात चाकरमान्यांच्या मोठ्या ओघाची अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल ५००० जादा गाड्या कोकणातील विविध मार्गांवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिकिट आरक्षित करता येणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळाच्या बस स्थानकांवर थेट तिकिट खरेदी करता येणार असून, MSRTC Bus Reservation अॅप द्वारेही हे आरक्षण सहज शक्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT