Goa Taxi: 'टॅक्‍सी व्‍यवसायातील भोंगळ व्‍यवस्‍थेमुळे पर्यटकांमध्‍ये घट'! गुदिन्‍हो यांचा दावा; पारदर्शकतेसाठी ‘कॅब ॲग्रीगेटर’ धोरण

Goa Tourism: टॅक्‍सी व्‍यवसायात पारदर्शकता येणे गरजेचे आहे. त्‍यासाठीच सरकारने कॅब ॲग्रीगेटर धोरण आणल्‍याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्‍हो यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बोलताना स्‍पष्‍ट केले.
Mauvin Godinho, Goa Business
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: टॅक्‍सी व्‍यवसायातील भोंगळ आणि बेकायदेशीर व्‍यवस्‍थेमुळेच राज्‍यात येणाऱ्या देशी–विदेशी पर्यटकांमध्‍ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आगामी काळात पर्यटकांना राज्‍याकडे आकर्षित करण्‍यासाठी टॅक्‍सी व्‍यवसायात पारदर्शकता येणे गरजेचे आहे. त्‍यासाठीच सरकारने कॅब ॲग्रीगेटर धोरण आणल्‍याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्‍हो यांनी सोमवारी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बोलताना स्‍पष्‍ट केले.

गोव्‍यातील टॅक्‍सी व्‍यवसायात पारदर्शकता नाही. टॅक्‍सी व्‍यावसायिकांकडून पर्यटकांची आर्थिक लूट केली जाते, अशा तक्रारी वारंवार पर्यटकांकडून सोशल मीडियाद्वारे केल्‍या जात आहेत. भविष्‍यात असे प्रकार कायम राहिल्‍यास त्‍याचा विपरीत परिणाम होऊन राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांत आणखी घट होऊ शकते.

Mauvin Godinho, Goa Business
Taxi Aggregator: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर'बाबत फेरविचार करावा! पायलट संघटनेची मागणी; पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसण्याची भीती

त्‍यामुळेच सरकारने टॅक्‍सी व्‍यवसायात पारदर्शकता आणण्‍यासाठी कॅब ॲग्रीगेटर धोरणाचे नियोजन केले. यासंदर्भातील मसुदा अधिसूचना जारी करून टॅक्‍सी व्‍यावसायिकांकडून सूचना आणि हरकतीही मागवण्‍यात आल्‍या आहेत. याबाबत आलेल्‍या सुमारे तीन हजार हरकतींची छाननी करून पुढील निर्णय घेण्‍यात येईल, असेही मंत्री गुदिन्‍हो म्‍हणाले.

Mauvin Godinho, Goa Business
Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

दबावामुळेच काही आमदारांचा विरोध

टॅक्‍सी ॲग्रीगेटर धोरणावरून स्‍थानिक टॅक्‍सीमालक आमदारांवर दबाव आणत आहेत. त्‍यामुळेच काही आमदार या धोरणाला विरोध करीत आहेत, परंतु सद्यस्‍थितीत आमदारांनी गोव्‍याचा विकास आणि पर्यटनवृद्धीचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. गोव्‍याबाबत जगभर जी नकारात्‍मकता पसरत आहे, ती दूर करण्‍यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही मंत्री माविन गुदिन्‍हो यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com