Ganesh Festival 2025 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना घातली बंदी

Mumbai-Goa Highway: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना लाखो भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Mumbai-Goa Highway: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना लाखो भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा गणेशोत्सवाला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 (NH-66) वर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

16 टन पेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर बंदी

राज्याचे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक सोयीसाठी गणेशोत्सवादरम्यान 16 टन किंवा त्याहून अधिक वजनाच्या वाहनांना या व्यस्त महामार्गावर प्रवास करण्यास मनाई असेल. हे निर्बंध ट्रक, मल्टी-अ‍ॅक्सल वाहने, ट्रेलर, लॉरी आणि इतर अवजड वाहनांना लागू असतील. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 नुसार हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

असा असेल निर्बंधांचा कालावधी

या वाहतूक निर्बंधांचे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.

  • पहिला टप्पा: भाविकांच्या पहिल्या गर्दीसाठी 23 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 28 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश बंद राहील.

  • दुसरा टप्पा: पाच आणि सात दिवसांच्या गणपती विसर्जन तसेच गौरी गणपती विसर्जनासाठी, 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीवर निर्बंध असतील.

  • तिसरा टप्पा: अनंत चतुर्दशीच्या (अकरा दिवसांचे गणपती) विसर्जनासाठी, 6 सप्टेंबरच्या सकाळी 9 वाजेपासून 7 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.

होळकर यांनी स्पष्ट केले की, या निर्बंधांच्या मधल्या काळात अवजड वाहनांना महामार्गावर प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. उदा. 28 ऑगस्टच्या रात्री 11 पासून 31 ऑगस्टच्या सकाळी 8 पर्यंत आणि त्यानंतर निर्बंधांच्या दुसऱ्या टप्प्याआधी व तिसऱ्या टप्प्याआधीही त्यांना प्रवास करता येईल. सर्व वाहनांसाठी वाहतूक 7 सप्टेंबरच्या रात्री 8 नंतर पूर्ववत सुरु होईल.

अत्यावश्यक सेवांना सूट

दरम्यान, या निर्बंधातून काही विशिष्ट वाहनांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. उदा, दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, धान्य, भाज्या आणि नाशवंत वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांना प्रवास करण्याची परवानगी असेल.

याशिवाय, जवाहरलाल नेहरु पोर्ट (JNPA) ते जयगड पोर्ट (रत्नागिरी) दरम्यान आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने आणि महामार्गावर रस्ते रुंदीकरण किंवा दुरुस्तीचे काम करणाऱ्या वाहनांनाही सूट मिळेल. या वाहनांसाठी परिवहन अधिकारी आणि महामार्ग पोलीस 'एंट्री पास' देतील, असेही सांगण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, गणेशोत्सवादरम्यान कोकणातील परिस्थितीनुसार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि किनारपट्टी भागातील जिल्हा पोलीस अधीक्षकांना वाहतूक निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. JNPA आणि जयगड पोर्टमधून मालाची वाहतूक अखंडित सुरु राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्थाही केली जाईल, असेही होळकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: 'जिकडे-तिकडे हायवेवर खड्डे, गणराया मी गावी येऊ कसे...'; मुंबई-गोवा महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल!

50 रुपयांची ट्रिक Rapido ला पडली महागात; भ्रामक जाहिरातींमुळे ठोठावला 10 लाखांचा दंड

मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

हे काय घडलं शेवटच्या चेंडूवर? विजयासाठी 1 रनची गरज असताना ट्वीस्ट, हातची मॅच गमावली; Watch Video

2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

SCROLL FOR NEXT