Morgan Stanley Layoffs: "70 अब्ज डॉलर्सचा नफा, तरीही नोकरीवर गदा!" मॉर्गन स्टॅनलीनं 2500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; 'हे' कारण ठरलं नोकरी जाण्याचं

Morgan Stanley Layoffs 2026: बँकेने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2500 लोकांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला.
Morgan Stanley Layoffs 2026
Morgan Stanley LayoffsDainik Gomantak
Published on
Updated on

Morgan Stanley Layoffs: सध्याच्या कॉर्पोरेट जगात जेव्हा 'नोकरकपाती'चा विषय निघतो, तेव्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर पहिले नाव येते ते म्हणजे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI). मानवी श्रमाची जागा आता यंत्रे घेणार, या भीतीने अनेकांच्या मनात धडकी भरवली आहे. मात्र, वॉल स्ट्रीटवरील दिग्गज मानल्या जाणाऱ्या 'मॉर्गन स्टॅनली' या इन्व्हेस्टमेंट बँकेने घेतलेल्या ताज्या निर्णयाने या सर्व धारणांना छेद दिला.

बँकेने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2500 लोकांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, या मोठ्या कपातीमागे एआय (AI) हे कारण नसून बँकेची बदललेली व्यावसायिक रणनीती जबाबदार असल्याचे समोर आले.

Morgan Stanley Layoffs 2026
Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉन 16000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ! पुन्हा एकदा 'ले-ऑफ'चा धडाका; बंगळुरु, हैदराबाद अन् चेन्नईतील ऑफिसेस 'हिटलिस्ट'वर

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, मॉर्गन स्टॅनलीने ही कपात प्रामुख्याने आपल्या तीन महत्त्वाच्या विभागांमध्ये केली. यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ट्रेडिंग, वेल्थ मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या विभागांचा समावेश आहे. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की, बँकेच्या 'फायनान्शिअल ॲडव्हायझर्स'ना या कपातीचा कोणताही फटका बसलेला नाही.

डिसेंबर 2025 अखेरपर्यंत बँकेकडे एकूण 82992 कर्मचारी कार्यरत होते, ज्यापैकी आता 2500 कर्मचारी कमी झाले आहेत. सामान्यतः जेव्हा एखादी कंपनी तोट्यात असते, तेव्हा कर्मचारी कपात केली जाते; परंतु मॉर्गन स्टॅनलीच्या बाबतीत चित्र पूर्णपणे वेगळे आहे. बँकेने 70.6 अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल नोंदवला असून, 2025 च्या शेवटच्या तिमाहीत त्यांच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग महसुलात तब्बल 47 टक्क्यांची मोठी वाढ झाली होती.

Morgan Stanley Layoffs 2026
Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

एवढी मोठी कमाई आणि विक्रमी महसूल असतानाही बँकेने हा कठोर निर्णय का घेतला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, हे पाऊल व्यवसायातील कामगिरी आणि बदलत्या धोरणांवर आधारित आहे. बँक सध्या आपली 'लोकेशन स्ट्रॅटेजी' बदलत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या जुन्या भूमिकांची किंवा पदांची आता बँकेला गरज वाटत नाही, ती पदे रद्द केली जात आहेत. त्याऐवजी, ज्या क्षेत्रांमध्ये भविष्यात विकासाच्या मोठ्या संधी आहेत, तिथे नवीन भरती करण्यावर बँकेचा भर आहे.

Morgan Stanley Layoffs 2026
Google Layoffs: गुगलचा मोठा निर्णय; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

मॉर्गन स्टॅनली जरी याला रणनीती म्हणत असली, तरी तंत्रज्ञान विश्वात मात्र एआयचा (AI) धोका वास्तव बनू लागला आहे. ओरॅकल (Oracle) कंपनी आपली एआय क्षमता वाढवण्यासाठी सुमारे 20000 नोकऱ्या कमी करण्याच्या तयारीत आहे, तर जॅक डॉर्सी यांच्या 'ब्लॉक' (Block) कंपनीने आपल्या कर्मचारी संख्येत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला.

Morgan Stanley Layoffs 2026
TikTok Layoffs in India : टिकटॉकच्या भारतातील प्रवासाला फुल्लस्टॉप! संपूर्ण भारतीय टीमला दाखवला घरचा रस्ता

मॉर्गन स्टॅनलीचे हे पाऊल सिद्ध करते की, केवळ एआयच नाही तर बदलत्या व्यावसायिक गरजा आणि प्राधान्यक्रमही तुमच्या नोकरीवर टांगती तलवार आणू शकतात. बँक आता अशा ठिकाणी गुंतवणूक (Investment) करु इच्छित आहे जिथून भविष्यात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीही बँकेने 2000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावरुन स्पष्ट होते की, वॉल स्ट्रीट आता 'लिन अँड मीन' म्हणजेच कमी कर्मचारी आणि जास्त काम या धोरणावर वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे भविष्यात केवळ तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर व्यवसायातील बदलत्या गरजांनुसार स्वतःला अपडेट ठेवणे हे कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com