गोव्याचा फिरकीपटू मोहित रेडकर बीसीसीआय शिबिरात, हरभजन सिंग देणार 'गुरुमंत्र'

Mohit Redkar BCCI bowling camp: गोलंदाजी प्रशिक्षण शिबिरासाठी फिरकी विभागात गोव्याचा ऑफ स्पिनर मोहित रेडकर याची निवड करण्यात आली आहे.
Mohit Redkar BCCI bowling camp
Mohit Redkar BCCI bowling campDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) घेण्यात येणाऱ्या गोलंदाजी प्रशिक्षण शिबिरासाठी फिरकी विभागात गोव्याचा ऑफ स्पिनर मोहित रेडकर याची निवड करण्यात आली आहे.

२३ ते २६ मार्च या कालावधीत बंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे भारताचे माजी महान ऑफस्पिनर हरभजन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होईल.

देशातील सर्व राज्यातील गोलंदाजांना या शिबिरासाठी निवडण्यात आले असून गोवा क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारा मोहित एकमेव गोलंदाज आहे.

खेळाडूंच्या निवडीचे पत्र बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी संबंधित क्रिकेट संघटनांना पाठविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com