Aryan Khan Dainik Gomantak
महाराष्ट्र

आर्यन खानला पाळावे लागतील 'हे' नियम, नाहीतर...

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना जामीन मिळाला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह (Aryan Khan) अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना जामीन मिळाला आहे. मात्र, जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. जे तीनही आरोपींना जामीन कालावधीमध्ये पाळाव्या लागणार आहेत. जामीन आदेशानुसार तिन्ही आरोपींना दर शुक्रवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो देश सोडून जाऊ शकत नाही.

न्यायालयाच्या आदेशानुसार, आर्यन आणि अन्य दोन आरोपी एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाहीत. यासोबतच त्याला त्याचा पासपोर्ट तात्काळ विशेष न्यायालयासमोर जमा करण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या सहआरोपींच्या संपर्कात राहण्यासही बंदी असेल.

या आहेत न्यायालयाच्या आदेशातील सर्व अटी-

  • न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींना एक लाख रुपयांचा पीआर बाँड द्यावा लागणार आहे. हे एक किंवा अधिक सुरक्षा ठेवींसह सादर केले जाऊ शकतो.

  • एनडीपीएस कायद्यांतर्गत ज्या आधारावर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातंर्गत अशा कोणत्याच पार्टस्थित कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

  • आरोपीने त्याच्या सहआरोपी किंवा तत्सम कृतीत सहभागी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु नये.

  • आरोपीने माननीय विशेष न्यायालयाच्या कार्यवाहीपूर्वी कार्यवाहीला बाध्य होणारे असे कोणतेही कृत्य करु नये.

  • आरोपीने वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही माध्यमातून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करु नये किंवा पुराव्याशी छेडछाड करु नये.

  • आरोपींना त्यांचा पासपोर्ट तात्काळ विशेष न्यायालयासमोर सादर करावा लागणार आहे.

  • विशेष न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या उपरोक्त कार्यवाहीच्या संदर्भात आरोपीने प्रसारमाध्यमांमध्ये कोणतेही विधान करु नये. (प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियासह).

  • विशेष एनडीपीएस न्यायाधीश, बृहन्मुंबई यांच्या पूर्वपरवानगीशिवाय आरोपी देश सोडणार नाही.

  • जर आरोपींना बृहन्मुंबईबाहेर जावे लागले, तर ते तपास अधिकाऱ्यांना सांगावे लागेल आणि तपास अधिकाऱ्याला त्यांचा प्रवास कार्यक्रम देतील.

  • आरोपींना दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत एनसीबी मुंबई कार्यालयात हजेरी लावावी लागेल.

  • कोणत्याही न्याय्य कारणाने प्रतिबंधित केल्याशिवाय, आरोपी सर्व तारखांना न्यायालयात हजर राहतील.

  • आरोपींना एनसीबी अधिकार्‍यांसमोर हजर राहावे लागेल.

  • एकदा खटला सुरु झाल्यानंतर, अर्जदार/आरोपी कोणत्याही प्रकारे खटल्याला विलंब करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.

  • आरोपींनी यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास, NCB ला त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी थेट विशेष न्यायाधीश/न्यायालयाकडे अर्ज करण्याचा अधिकार असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT