Raj thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune: 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणेवरून राज ठाकरे आक्रामक, म्हणाले 'ही कीड समूळ नष्टच करा'

राज ठाकरे यांचे केंद्र आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती करणारे पत्र

गोमन्तक डिजिटल टीम

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक नेते, राजकीय पुढारी प्रतिक्रिया देत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, त्यांनी आक्रामक भुमिका घेतली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी याबाबत एक पत्र लिहले असून, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सार्वजनिक केले आहे.

राज ठाकरे (Raj thackeray) यांनी पत्रात काय म्हटले आहे.

'देशद्रोह्यांचे समर्थन करत पीएफआय कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही धेरं आमच्या देशात चालणार नाहीत. माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त देशद्रोह्यांनाच नव्हे तर ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही!'

'नाहीतर आता या ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मराठ्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचाच सणासुदीच्या काळात अशांतत पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.' असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.

पुण्यात काय झाले?

केंद्रीय यंत्रणांनी पीएफआय विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे नियोजन केलं होतं. पुणे पोलिसांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं. यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT