ShivSena Dussehra Melava: शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच; न्यायालयाचा निर्णय

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला परवानगी
ShivSena Dussehra Melava: शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच; न्यायालयाचा निर्णय
Published on
Updated on

महाराष्ट्रातील सरकार बदलल्यापासून शिवसेनेतील शिंदे-ठाकरे (Shinde-Thackray) गटाची न्यायालयीन लढाई सुरू आहे. या लढाईत नेहमीच नेहमीच शिंदे गटाच्या बाजूने झुकाणारे निर्णय पाहायला मिळाले आहेत. शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याचा (ShivSena Dussehra Melava) वाद देखील न्यायालयात गेला. पण, शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला परवानगी मिळाली असून, ठाकरे गटाचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) याबाबत आज निर्णय दिला.

ShivSena Dussehra Melava: शिवतीर्थावर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच; न्यायालयाचा निर्णय
Viral Video: आजारी बिबट्यासोबत लोक व्हिडिओ, फोटो काढण्यात व्यस्त; बिबट्याचा मृत्यू

दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. पक्षाचे प्रमुख यादिवशी उपस्थितांना संबोधित करत असतात. पण, शिवसेनेत शिंदे-ठाकरे असे दोन गट पडल्याने दसरा मेळाव्याचा वाद न्यायालयात केला. यावरून राज्यात चांगलेच घमासान झाले. मुंबई न्यायालयाने आज यावर सुनावणी घेत सर्व दावे ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय ठाकरे गटांच्या बाजूने दिला.

याआधी न्यायालयाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर हायकोर्टाने महापालिकेला देखील झापलं. पालिकेनं आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होत आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटल आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com