ED reached the house of Shiv Sena leader Yashwant Jadhav Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात आणखी एक नेता तपास यंत्रणेच्या रडारवर; शिवसेनेची होणार अडचण

केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना नेत्याची ED कडून चौकशी सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय तपास यंत्रणांकडून गैरवापर करत कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होत असतानाच आणखी एका शिवसेना (Shiv Sena) नेत्याची ED कडून चौकशी सुरु झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने नवाब मलिक यांना अटक केल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी पोहोचले. ANI च्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. (ED reached the house of Shiv Sena leader Yashwant Jadhav)

प्राप्तिकर विभागाचं पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या मुंबईतील (Mumbai) घऱी पोहोचलंल आहे. माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरुच आहे. दरम्यान तपास सुरु असल्याने इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत तसेच यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याप्रमाणे पहाटेच प्राप्तिकर विभागाचं पथक यशवंत जाधव यांच्या माझगावमधील निवासस्थानी दाखल झालं आहे. मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने आर्थिक निर्णयांमध्ये यशवंत जाधव यांचा देखील सहभाग असतो. पालिकेच्या कंत्राट आणि अन्य व्यवहारांमध्येही स्थायी समितिची भूमिका ही महत्वाची असते. याआधीही भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आहे.

यशवंत जाधव शिवसेनेचे महत्वाचे नेते असल्याने या कारवाईमुळे राजकीय वातावरण अजून पेटत जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गेल्या महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा देखील आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटले होते.

मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी रोख स्वरुपात 15 कोटी रुपये मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला आहे. आणि हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे थेट संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे 15 कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी त्यावेळी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT