दिवसा ढवळ्या नागपुरी शेतकऱ्याला लावला हजारोंचा चुना

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका 67 वर्षीय शेतकऱ्याने फेसबुकद्वारे ऑनलाइन गाय खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर त्या शेतकऱ्याला ती गाय 34,000 रुपयांना सांगूण त्यांची फसवणूक करण्यात आली.
Farmer
FarmerDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका 67 वर्षीय शेतकऱ्याने फेसबुकद्वारे ऑनलाइन गाय खरेदी करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला ती गाय 34,000 रुपयांना सांगूण त्यांची फसवणूक (fraud) करण्यात आली आहे. या संबधित पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पारशिवनी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, खंडाळा गावातील शेतकरी (Farmer) सुखदेव पांडुरंग गुरवे यांनी फेसबुकवर सोनू कुमार असे नाव टाकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Thousands of rupees have been laundered from a farmer in Nagpur by cheating him on Facebook)

Farmer
नाशिक-पुणे महामार्गावर बारावी परिक्षा पेपरच्या ट्रकला लागली आग

गुरवे यांना नुकतीच फेसबुकच्या माध्यमातून एक ऑफर मिळाली होती, ज्यात ते 58 हजार रुपयांमध्ये दोन गायी खरेदी करू शकतात. अशा परिस्थितीत त्यांनी फेसबुकवर जाहिरात टाकणाऱ्या सोनू कुमारशी संपर्क साधला आणि सौदा मिटवला. शेतकऱ्याने त्याच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये एकूण 34,000 रुपये जमा केले आहेत. मात्र, त्यानंतर कुमार यांनी प्रतिक्रिया देणे बंद केले आणि काहीतरी गडबड असून आपली फसवणूक झाल्याचे गुरवे यांना समजले.

त्यानंतर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली, अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात आयपीसीच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकच्या माध्यमातून लुटमार आणि फसवणुकीची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अशी प्रकरणे बऱ्याचदा समोर आली आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक वेळा निष्पाप मुलांची लूट करण्यात आली असून अनेक वेळा प्रेम, लैंगिक संबध, फसवणूक अशा गोष्टीही समोर आल्या आहेत. फेसबुकच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कारासारखे प्रकारही घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com