Samruddhi Mahamarg Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

VIDEO: देवीची मूर्ती आणताना काळाचा घाला! दुर्गोत्सवाच्या तयारीला गालबोट, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; 21 जखमी

Samruddhi Mahamarg Accident: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरो पिकअप वाहनाची भीषण धडक झाली.

Sameer Amunekar

Dhamangaon Railway Samruddhi Mahamarg Accident

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि बोलेरो पिकअप वाहनाची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल 21 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला.

देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे निघाले होते

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे काही कार्यकर्ते शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जात होते. यासाठी बोलेरो पिकअप वाहनाचा वापर करण्यात आला होता. वाहनामागे ट्रॉली जोडण्यात आली होती आणि त्यामध्ये देवीची मूर्ती ठेवण्यात आली होती.

धामणगाव रेल्वे परिसरातील समृद्धी महामार्गावरून हे वाहन जात असताना चॅनल क्रमांक 97 जवळ ट्रक आणि पिकअपची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की वाहनातील अनेक जण गंभीर जखमी झाले.

7 जणांचा जागीच मृत्यू

अपघाताची तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी मोठी गर्दी झाली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींची संख्या 21 दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच धामणगाव रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनांमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

गंभीर जखमींना वर्ध्यात हलवले

अपघातातील जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनानेही रुग्णालयात धाव घेतली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम तसेच धामणगावच्या नगराध्यक्षा अर्चना रोठे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आणि उपचार व्यवस्थेची माहिती घेतली.

अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

या दुर्घटनेनंतर समृद्धी महामार्गावरील वाहतुकीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ट्रक आणि पिकअपमध्ये नेमकी धडक कशामुळे झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वाहनांचा वेग, चालकाचे नियंत्रण किंवा इतर कोणते कारण या अपघातामागे होते का, याची माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, देवीची मूर्ती आणण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातातील मृतांची आणि जखमींची अधिकृत ओळख पटवण्याची प्रक्रिया तसेच पुढील कायदेशीर कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Panel: दामोदर कॉलेज विद्यार्थी मंडळ निवडणुकीत 'गोवा फॉरवर्ड'चा झेंडा; चारही प्रमुख जागा पॅनलच्या ताब्यात

Diveagar Beach Tragedy: दिवेआगर समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; सहलीसाठी आलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

LPG Price: व्यावसायिक गॅस सिलिंडर 70 रुपयांनी महागला; घरगुती गॅसचे दर मात्र 'जैसे थे'

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

SCROLL FOR NEXT