Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Viresh Borkar October 2 Announcement: ‘मुलाखतीत त्‍यांना मनोज परब यांच्‍या आरजी प्रवेशाबाबत विचारले असता, ‘‘मनोज परब पुन्‍हा आरजीत येणार की नाही? त्‍याची माहिती आपल्‍याला नाही.
Viresh Borkar October 2 Announcement
Goa PoliticsDainik Gomanatk
Published on: 
Updated on: 

पणजी: गांधी जयंतीचा मुहूर्त साधत येत्‍या २ ऑक्‍टोबर रोजी मनोज परब पुन्‍हा रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षात (आरजी) प्रवेश करून पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात असतानाच, स्‍वत:च आरजीचे राष्ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणून घोषित केलेल्‍या आमदार वीरेश बोरकर यांनीही २ ऑक्‍टोबर रोजीच मोठी घोषणा करणार असल्‍याचे ‘गोमन्‍तक’ला दिलेल्‍या विशेष मुलाखतीत सांगितले.

‘मुलाखतीत त्‍यांना मनोज परब यांच्‍या आरजी प्रवेशाबाबत विचारले असता, ‘‘मनोज परब पुन्‍हा आरजीत येणार की नाही? त्‍याची माहिती आपल्‍याला नाही. परंतु, तसे असेल तर त्‍यांच्‍याबाबत पक्षाची राज्‍य आणि इतर समित्‍या निर्णय घेतील. पण, २ ऑक्‍टोबरला आपणही मोठी घोषणा करणार आहे’’, असे त्‍यांनी सांगितले.

Viresh Borkar October 2 Announcement
Goa IDC E Auction: गोव्यात 50 भूखंडांचा ई-लिलाव; वेर्णा, लाटंबार्से अन् किटलातील भूखंडांसाठी 'आयडीसी'ची नोटीस जारी

गोमंतकीय जनतेचा ‘आरजी’वर पूर्ण विश्‍‍वास आहे. सत्ताधारी भाजपला पराभूत करणे हेच आमचे ध्‍येय आहे. त्‍यामुळेच आम्‍ही पक्षसंघटना नव्‍याने बांधण्‍यावर, सदस्‍यता नोंदणी मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. सद्य:स्‍थितीत आमचे २५ मतदारसंघांत काम सुरू असून, इतर मतदारसंघांतील समित्‍यांची पुनर्रचना करण्‍याचेही काम सुरू आहे, असे बोरकर यांनी नमूद केले.

अजयला बोलण्‍याचा अधिकारच नाही!

‘‘खजिनदारपदी असताना अजय खोलकर यांनी पक्षाच्‍या निधीचा गैरव्‍यवहार केला आहे. त्‍याची पोलखोल लवकरच होईल. निधी गैरव्‍यवहार तसेच पक्षाच्‍या पदाधिकाऱ्यांवर नाहक आरोप केल्‍याबाबत स्‍पष्‍टीकरण देण्‍यासाठी शिस्‍तपालन समितीने त्‍यांना नोटीस जारी केली होती. परंतु, स्‍पष्‍टीकरणासाठी ते उपस्‍थित राहिले नाहीत.

त्‍यामुळे त्‍यांचे पक्षातून निलंबन करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे अजय खोलकर यांना आपल्‍याविरोधात बोलण्‍याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तसे असेल तर त्‍यांनी आपले अधिकार दाखवून द्यावे’’, असे आव्‍हानही वीरेश बोरकर यांनी दिले. शिवाय, ‘‘खोलकर यांच्‍याविरोधात आम्‍ही कायदेशीर कारवाई करणार आहोत’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

Viresh Borkar October 2 Announcement
Goa Grand Alliance: 'जनभावनेला प्राधान्य, घाईगडबडीत निर्णय नाही'; ग्रँड अलायन्सवर विजय सरदेसाईंची भूमिका स्पष्ट

आमचा विरोध ‘त्‍या’ परप्रांतीयांना

‘‘इतर राज्‍यांतून गोव्‍यात आलेल्‍या परप्रांतीयांना आरजीचा अजिबात विरोध नाही. जे परप्रांतीय गोव्‍यात राहून गोवा किंवा गोव्‍यातील जनतेला बाधक ठरणाऱ्या गोष्‍टींमध्‍ये सहभागी होतात, त्‍यांना आमचा विरोध असून, यापुढेही तो कायम राहील’’, असेही वीरेश बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com