COVID-19: Vaccination & RTPCR now mandatory while entering Maharashtra Dainik Gomantak
महाराष्ट्र

COVID-19: आता महाराष्ट्रात प्रवेश करताना या अटी बंधनकारक

कोरोनाच्या (COVID-19) दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात बाहेरून प्रवेश करणाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या (COVID-19) दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात बाहेरून प्रवेश करणाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आणि आता राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोकांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी दोनपैकी एक अट पाळावीच लागेल (New Rules in Maharashtra). त्यातली पाहाती अट कोरोना लसीकरणा (Vaccination) संदर्भातली असून आता ज्यांना राज्यात बाहेरून यायचे आहे त्यांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. आणि दुसरा डोस घेऊनही त्या व्यक्तीला 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.(COVID-19: Vaccination & RTPCR now mandatory while entering Maharashtra)

आणि सरकारने लावलेली दुसरी अट अशी आहे की कोरोना चाचणीचा निगेटिव्ह आरटी पीसीआर (RTPCR) अहवाल 72 तासांच्या आत द्यावा लागेल दोनपैकी कोणतीही अट पूर्ण न झाल्यास त्या संभांदित व्यक्तीस 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यामध्ये 15 ऑगस्टपासून मॉल्स, रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी होती. तथापि, यासह एक अट देखील असेल की सर्व कर्मचार्यांना पूर्णपणे लसीकरण केले पाहिजे आणि मॉल्स मध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना देखील लसीकरण प्रमाणपत्रही दाखवावे लागणार आहे.

याशिवाय रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी होती. या आस्थापनांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेतले असतील केवळ याच अटीवर रात्री 10 पर्यंत स्पा आणि जिम यांना 50 टक्के क्षमतेसह काम करण्याची परवानगी असेल, असे मार्गदर्शकतत्वात म्हटले आहे. तर दुसरीकडे 200 लोकांना मोकळ्या जागांवर विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्याची परवानगी असेल, असे मार्गदर्शक तत्वात म्हटले होते. तर सभागृहाच्या क्षमतेच्या 100 किंवा 50 टक्के बंद हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT