Maharashtra:राज्यात हॉटेल, मॉल सुरू मात्र 'देऊळ बंदच'!

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) बाबतही सविस्तर चर्चा झाली
Maharashtra Unlock: Malls, restaurant's restarts but temple still closed
Maharashtra Unlock: Malls, restaurant's restarts but temple still closed Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली आहे. या बैठकीत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) बाबतही सविस्तर चर्चा झाली मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. कारण अद्याप तरी अनेक निर्बंधात सरकारने कुठलीही शिथिलता दिली नाही. असेच दिसत आहे.

मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांबद्दल माहिती दिली आहे. (Maharashtra Unlock: Malls, restaurant's restarts but temple still closed)पाठविण्यात

Maharashtra Unlock: Malls, restaurant's restarts but temple still closed
महाराष्ट्रात 17 ऑगस्टला शाळेची घंटा वाजणार

राज्यातील मंदिरे तूर्तास बंदच असणार आहेत. त्याचबरोबर सिनेमा मल्टिप्लेक्स,नाट्यगृग बाबत कुठलीही सूट देण्यात आली नाही. मुंबईच्या लोकल बाबत जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पुर्ण झाले असतील तरच लोकलने प्रवासा करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यभरातील हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरू -

आज बैठकीत झालेल्या काही महत्वाच्या निर्णयांची अंमलबाजवणी 15 ऑगस्टपासून होणार आहे. राज्यभरातील हॉटेल, मॉल्सलाही रात्री 10 वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागाकडून मुख्यमंत्र्यांना राज्यातील काही निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता आणि त्याच प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार 15 ऑगस्टपासून हे नियम लागू होणार आहेत. असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या बैठकीत राज्यातील हॉटेल्सना 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आली असून रात्री 10 पर्यंत ती आता सुरू ठेवता येणार आहेत.

लग्नकार्यासाठीचे नवीन नियम -

लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर 200 माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा १०० माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

कार्यालयांसाठीची नियमावली -

सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्राध्यान्यानं लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले असून ज्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे त्यांना पूर्ण क्षमतेनं कार्यालये सुरु करण्यास परवानगी देण्यात अली आहे तसेच चोवीस तास खासगी कार्यालये सुरु ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com