Truck  Dainik Gomantak
महाराष्ट्र

भरधाव कंटेनर रस्त्यावरून थेट घरात, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई-गोवा महामार्गावरील खांब येथे एक भरधाव मालवाहू कंटेनर रस्त्यावरून उतरून दोन घरांना धडकला. ही घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडली. यामध्ये घरांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झालेली नाही.

कंटेनरच्या धडकेमुळे घरांचे आणि एका दुकानाचे नुकसान झाले. यातील एक घर चेतन मेहता यांच्या मालकीचे असून अपघाताच्या रात्री ते आपल्या कुटुंबियांसोबत घरातच होते. प्रवीण भानत यांच्या घराला मात्र कुलूप होते.

चालक देवीप्रसाद मौर्य याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनरच्या वेगामुळे तो घरांमध्ये किमान 10 फूट आत गेला. या अपघातात (Accident) चालकाला दुखापत झाली. त्याला तातडीने अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे कोलाड पोलिस (Police) ठाण्यातील एपीआय सुभाष जाधव यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील (Road) खड्डे आणि गाडीचा वेग या दोन्ही कारणांमुळे हा अपघात झाला. वेगवान गाडी चालवणे आणि नुकसान केल्याच्या आरोपाखाली चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालयातून (Hospital) डिस्चार्ज झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT