हिंदू विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधून हिजाबच्या वादावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पत्रकार राणा अय्युबच्या (Rana Ayyub) अडचणी वाढल्या आहेत. आता उड्डपी कॉलेजमध्ये भगवा ध्वज फडकावणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणून संबोधल्या प्रकरणी कर्नाटकच्या (Karnataka) हुबळी धारवाड पोलिसांनी राणा अय्युबविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. खरं तर, हिजाबवरून कर्नाटकात सुरू झालेल्या वादाच्या संदर्भात 13 फेब्रुवारी 2022 रोजी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत उडपीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दहशतवादी (Terrorist) म्हणून संबोधण्यात आले होते. यानंतर 21 फेब्रुवारीला हिंदू आयटी सेलने राणा अयुबविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुलाखतीत केले वादग्रस्त विधान
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राणा अयुब यांनी शैक्षणिक संस्थेत बुरख्याला विरोध करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले होते. 'हा तरुण हिंदूंचा गट, हिंदू दहशतवादी कर्नाटकातील शैक्षणिक परिसरात भगवे झेंडे का फडकवत आहेत?,' असे राणा अय्युब म्हणाली होती. खरे तर, या मुलाखतीत अयुब यांना विचारण्यात आले की, शैक्षणिक संस्थेत पुरुष विद्यार्थी भगवे झेंडे का फडकवत आहेत. याचा काय अर्थ? या प्रश्नाच्या उत्तरात राणा अय्युबने हिंदू विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले होते.
धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल,
नरेंद्र मोदी सरकारची कट्टर टीकाकार राणा अय्युबवर आयपीसी दंड संहितेच्या कलम 295A (धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक आणि दुर्दैवी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळल्यास शिक्षा होऊ शकते. राणा अयुब ही आपल्या देशातील आर्थिक फसवणुकीच्या वादामुळे देखील चर्चेत राहिली आहे. अलीकडेच ईडीने तीच्यावर कडक कारवाई करत 1.77 कोटी रुपये जप्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.