नवी दिल्ली : राज्यातील महाविकास आघाडी समोर विरोधी पक्षातील नेत्यांचे आवाहन असतानाच महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस पक्षातील नेत्यांनीही आता त्रास देण्यास सुरूवात केली आहे. यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही चांदिवली मतदारसंघात उमेदवार दिलीप लांडे यांचा प्रचार केला. तसेच त्यांनी त्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आमदार लांडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी नसीम खान यांनी याचिकेतून केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. मात्र असे काहीच होणार नसल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले. (Congress leader Arif Naseem Khan has moved the Supreme Court against CM Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे हे चांदिवली मतदारसंघात येऊन प्रचार करत असतानाचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयात नसीम खान यांनी सादर केला आहे. तसेच, २० ऑक्टोबरला उद्धव ठाकरे चांदिवली मतदारसंघात आले असल्याचे पोलीस (police) स्टेशन डायरीमध्ये नमूद असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ ४०९ मतांनी नसीम खान यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. पंरतु, न्यायालयाने याचिका फेटाळली.
त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. तसेच त्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेतून केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि आमदार दिलीप लांडे यांना न्यायालयाने नोटीस बजावल्या असून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.