राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना याबाबत अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Omicron Variant: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील शाळांच्या घंटा वाजणार?

राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना याबाबत अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: Omicron या कोरोनाचे (Covid 19) नवीन प्रकार समोर आल्याने जगात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात कोरोनाच्या या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

अशा स्थितीत राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत अंतिम शिक्कामोर्तब करायचे आहे. हा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला. त्यावर आरोग्य विभागाने देखील हिरवा कंदिल दाखविला आहे. दरम्यान, ओमिक्रॉन प्रकारांच्या धोक्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरू व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत. मात्र आज मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचीही मान्यता नाही. अशा स्थितीत शाळा प्रशासनाच्या तयारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुलांच्या पालकांनाही अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. सध्या चेंडू आरोग्य विभागाच्या कोर्टात आहे.

शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय आरोग्य विभाग घेणार

नवीन प्रकाराबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याबाबत राज्यातील नवीन निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वाचे काय करायचे? कोरोनाच्या काळातील निर्बंधानंतर अर्थव्यवस्था मोठ्या कष्टाने रुळावर आली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा निर्बंध लादले गेले तर अर्थव्यवस्था देखील डबघाईला येऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी, त्यानंतर नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, अशी सूचना बहुतांश मंत्र्यांची होती.

शाळा सुरू झाल्यावर नियम पाळणे सोपे नाही

राजेश टोपे म्हणाले, या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत आता आरोग्य विभाग निर्णय घेणार आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी अनेक तयारी करावी लागते. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील. सामाजिक अंतर राखावे लागेल. एकमेकांपासून सहा फूट अंतर असावे. मास्क घालणे आवश्यक असेल. शाळेच्या आवारात गर्दी होणार नाही याची जबाबदारी शाळा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. शाळेत स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी लागेल. काही विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य नसेल, तर त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्गाची व्यवस्था करावी लागणार आहे.

परंतु व्यावहारिकदृष्ट्या पहावयाचे असल्यास सामाजिक अंतर पाळणे सोपे नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून शाळेचा परिसर लहान आहे. या सर्व बाबींचा विचार करून अनेक शाळांनी 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारीही सुरू केलेली नाही. दरम्यान, ओमिक्रॉन प्रकारांच्या धोक्यामुळे पालकांच्या मनातही शंका निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत राज्य सरकार येत्या दोन दिवसांत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT