Maharashtraमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे एकही रुग्ण दगावला नाही: राजेश टोपे

केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने संसदेमध्ये सुद्धा असे सांगितले गेले आहे की, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (Oxygen Crisis) एकही रुग्ण मरण पावला नाही.
Health Minister Rajesh tope
Health Minister Rajesh topeDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोनाच्या दुसर्‍या (Covid19 Second Wave) लाटेदरम्यान महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या अभावामुळे (Lack of Oxygen) एकही रूग्ण दगावला नसल्याचे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope) यांनी सांगितले आहे. असे प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे."आम्ही महाराष्ट्रात आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा केला. औद्योगिक क्षेत्रात दिला जाणार ऑक्सिजन वळवुन लिक्विड मेडीकल ऑक्सिजनसाठी दिला. तसेच राज्यात ऑक्सिजनचा अपव्यय सुद्धा होत नसुन आम्ही ऑक्सिजनचा योग्य वापर केला आहे. दुसर्‍या लाटेच्या वेळी महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी योग्य व्यवस्थापन केले गेले होते. 65 हजार रुग्ण येत असताना देखील, त्यावेळीसुद्धा योग्य व्यवस्था केली गेली होती. देवाच्या कृपेने राज्यात ऑक्सिजन नसल्यामुळे एकही रूग्ण मरण पावला नाही" असे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Health Minister Rajesh tope said no deaths due to lack of oxygen in maharashtra shk99)

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने संसदेमध्ये सुद्धा असे सांगितले गेले आहे की, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही रुग्ण मरण पावला नाही. मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असुन आणि राज्ये नियमितपणे कोरोना प्रकरण आणि मृत्यूबद्दल केंद्र सरकारला माहिती देतात. परंतु ऑक्सिजनच्या कमतरतेबाबत राज्यांनी केंद्र सरकारला कोणताही विशिष्ट डेटा दिला नाही.

त्याचवेळी आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी संसदेला सांगितले की, पंतप्रधान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद करण्यासाठी राज्यांना सतत विचारत आहेत. ही राज्यांची जबाबदारी आहे. तसेच ते पुढे असेही म्हणाले की, राज्यांनी प्रदान केलेला डेटा संकलित करणे हेच केंद्र सरकारचे हेच कर्तव्य असते.

Health Minister Rajesh tope
Maharashtra FYJC CET 2021: जाणुन घ्या कसा कराल अर्ज

दरम्यान, राज्यांकडून ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्यूंची आकडेवारी न मिळाल्याने विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तर दुसर्‍या लाटेच्या शिखरावर असताना रुग्णालयात रूग्णांच्या मृत्यूच्या अनेक मोठ्या घटनांनी जगाचे लक्ष भारताकडे वेधले होते. आम आदमी पार्टी, कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारला या विषयावर घेरल्याचे दिसुन आले.

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांनी बुधवारी सांगितले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे देशात बर्‍याच रुग्णांचा मृत्यू झाला. अशा घटना दिल्लीमध्येही पाहायला मिळाल्या. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तसे झाले नसते तर रुग्णालये उच्च न्यायालयास का जात आहेत? केंद्र सरकार असेही म्हणू शकते की देशात कोणताही साथीचा रोग आला नाही, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com