TET परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात: राजेश टोपे

आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड च्या परीक्षा(Exam) रद्द झाले नंतर त्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात केल्या होत्या.
Rajesh Tope
Rajesh Tope Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आरोग्य विभागाच्या (Department of Health)परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आले होत्या. त्या नंतर या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. आता मात्र आरोग्य विभाग (Health Departmenr) आणि शिक्षक पात्रता परीक्षा या एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये आता संभ्रम तयार झाले आहे. कारण काही यापैकी विद्यार्थी टीईटी (TET) परीक्षेला देखील बसले आहेत. यामुळे आता दोन्ही पैकी नक्की कोणत्या परीक्षा द्यायची असा प्रश्न विद्यार्थ्या समोर उभ्या आहेत.

त्याबद्दल राजेश टोपे म्हणाले, 31 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) एकत्र घेण्यात येणार आहेत. त्या बाबत मी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे. त्या बाबत त्यांना मी विनंती केली आहे, आरोग्य विभागाची परीक्षा आता कोरोना काळात तातडीने घेणे आवश्यक आहे. यामुळे TET परीक्षेच्या तारखा बदलून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा, त्यामुळे याबाबत विचार करावा. तसेच राजेश टोपेंनी शिक्षक संचालकांशी बोलल्याचे देखील सांगितले. या परीक्षण अजून एक महिना आहे, यातून मार्ग काढण्यात येईल. परीक्षार्थींचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असा विश्वास राजेश टोपेनी दिला

Rajesh Tope
ITBP Recruitment 2021: परीक्षा देण्याची आवश्यकता नाही

दरम्यान, परीक्षेच्या एक दिवस आधी अचानक रात्री उशिरा आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अचानक रद्द केल्यामुळे विद्यार्थांनमध्ये संतापले होते. आता या परीक्षेच्या तारीखा लवकर जाहीर कराव्यात म्हणून विरोधी पक्षांनी आंदोलन केली. न्यासा या कंपनीवर परीक्षेचे खापर फोडण्यात आले. ती एक ब्लॅक लिस्टेड(Blacklisted) कंपनी आहे मग त्यांना काम का दिले अशा जोरदार टीका करण्यात आल्या. यानंतर राज्य सरकारने काहीही विचार विनिमय न करता परीक्षांच्या तारखा जाहीर करून विद्यार्थांना दिलासा दिला. आणि TET परीक्षांच्या ताराखांचा घोळ करून तो आता काही संपणार नाही असे म्हणायची वेळ येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com