Students college Education Dainik Gomantak
महाराष्ट्र

लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये बंद

डेल्डा प्लस व्हारियंटने (Delta Plus Variant) या संकटात आणखी भर घातली आणि शिक्षणाचे (Education) पुन्हा तीन तेरा वाजले.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे (Covid-19) गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याचे चित्र राज्याच बघायला मिळत आहे. शाळा (Schools) आणि महाविद्यालये (Collage) बंद असल्याने ऑनलाईन (Online Education) पद्धतीने शिकवण्या घेण्यात येत आहे. कोरोना आटोक्यात येणार आणि महाविद्यालये पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा होती. मात्र, डेल्डा प्लस व्हारियंटने या संकटात आणखी भर घातली आणि शिक्षणाचे पुन्हा तीन तेरा वाजले. डेल्टा प्लसचा नवा विषाणू आढळल्याने राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले. अशातच आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. (Colleges will not start until the vaccination process is complete)

राज्यातील लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या वर्षीही शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीनेच सुरू ठेवण्यात आली आहेत. आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी मध्यंतरी करण्यात येत होती. मात्र लसीकरण प्रकिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने महाविद्यालयांची दार सध्यातरी बंदच राहणार आहेत.

"येत्या 15 सप्टेंबर 2021 पासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे," असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. तर येणाऱ्या 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.

दरम्यान, या सगळ्याबाबत बोलत असतांना शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. संवर्गानुसार भरती करायची असेल तर आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागांनी निर्णय कळवल्यास त्यानुसार भरती करण्यास तयार असल्याचे उदय सामंत म्हणाले आहे. संस्थांच्या रोस्टर पद्धतीने निर्णय घेतला तर भरती प्रक्रिया आणखी लांबली जाऊ शकते, अशी शक्यताही सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT