आता अजित पवार आणि अनिल परब यांचीही चौकशी करा - चंद्रकांत पाटील

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे
Chandrkant Patil Asks for Ajit Pawar and Anil Parab's enquiry
Chandrkant Patil Asks for Ajit Pawar and Anil Parab's enquiryDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपाचे(BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. पण या पत्राने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे कारण या पात्रात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar )आणि परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांची सीबीआय(CBI) चौकशी करा अशी मागणी केली आहे.

तसेच या पात्रात चंद्रकांत पाटील यांनी सचिन वाझे प्रकरणातल्याही अनेक गोष्टी गृहमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत . सचिन वाझे याला २००४ सालीच निलंबित करण्यात आलं होतं. मात्र, २०२० मध्ये सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने त्याला पुन्हा पोलीस दलात रुजू करुन घेतलं याच कारण नेमकं काय होत असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वाझे याने चौकशीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्या माध्यमातून त्याला बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून तसंच उत्पादकांकडून १०० कोटी वसूल करण्यास सांगितलं असल्याचेही त्यांनी या पात्रात म्हण्टलं आहे.

Chandrkant Patil Asks for Ajit Pawar and Anil Parab's enquiry
एड्सग्रस्तांना कोरोनाचा धोका कमी; एम्सच्या पाहणीतील निष्कर्ष

तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितल्याचं वाझे याने चौकशीत उघड केलं आहे, असंही या पत्रात लिहिलेलं आहे.

यावरून असे लक्षात येत की अजित पवार आणि अनिल परब यांनी सचिन वाझेला वसुली करण्यास सांगितले आहे .त्यामुळे या दोघांचीही सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पत्र देत केली आहे.पण आता यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत राज्यात सीबीआयला चोकशी करण्यास राज्य सरकारची परवानगी लागते तरीही चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांच्याकडे ही मागणी का केली असा प्रश्नही सर्वांना बुचकळ्यात पाडतोय.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप महाविकासाआघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहे. सचिन वाझे प्रकरणात तर भाजपने अक्षरशः राज्य सरकारवर टीकेचा भडीमार उठवला आहे. अगोदरच अनिल देशमुख यांचा पाय खोलात असतानाच काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या सीबीआय चौकशीची मागणीही एका पत्रकार परिषदेत केली होती.आणि चंद्रकांत पाटलांच्या य पत्रामुळे तर राज्यात पुन्हा लेटर बॉम्ब पडला असल्याचं बोलले जात आहे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com