Illegal Fishing: मासेमारी नौकेची नोंदणी करणे बंधनकारक का आहे ?

रत्नागिरीतील (Ratnagiri) सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने बेकायदेशीर मासेमारी (Illegal fishing) रोखण्यासाठी एक नामी शक्कल लढविली आहे.
Fishing boat on beach
Fishing boat on beachDainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी : सध्या पावसाळा सुरू झाल्याने बंदी कालावधीतील बेकायदेशीर मासेमारी (Illegal fishing) रोखण्यासाठी रत्नागिरीतील (Ratnagiri) सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने एक नामी शक्कल लढविली आहे. सध्याच्या काळात सर्व मासेमारी नौका बंदर (Fishing boat beach)आणि जेटीवर उभ्या आहेत. या नौकांचे नावं आणि नंबर घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदींमध्ये तपासले जाणार आहे. ज्या नौकांचे नाव आणि नंबर नोंदी कार्यालयाच्या नोंदीमध्ये नसतील, अशा नौकांचा शोध घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे. (Illegal Fishing Why it is mandatory to register a fishing boat)

सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी हे आदेश जिल्ह्यातील सर्व परवाना अधिकार्‍यांना दिले आहेत. य़ा आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आणि त्वरीत बंदर आणि जेटींवरील नौकांची नावे आणि नंबर संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.

Fishing boat on beach
गड किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना संभाजीराजेंचा सल्ला

अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून बंदी कालावधीमध्ये मासेमारी

बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्य विभागाने कितीतरी प्रयत्न केले; मात्र त्या सगळ्या प्रयत्नांना अपयश आले. गस्ती नौका नसल्याने हा विभाग काहीसा कमकुवत बनला आहे. या विभागातील अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून बंदी कालावधीमध्ये मासेमारी केली जाते. हे रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने एक नवी शक्कल लढविली आहे. बंदरात उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबर घेण्याची युक्ती करण्यात आली आहे. ज्या नाव आणि नंबरातील नौकांच्या नोंदी मत्स्य व्यवसाय विभागाच्या कार्यालयात नसतील त्या नौका अवैध आहेत, असे स्पष्ट होणार आहे.

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या या नव्या नियोजनानुसार ज्या नौका किनाऱ्यावर अनधिकृत आढळून येणार, त्यांची माहिती मच्छीमार सहाकारी संस्थांना कळवण्यात येणार आहे. तसेच काही बेकायदेशीर नौकादेखील संस्थांच्या सदस्य असण्याची शक्यता आहे. त्या नौकांना सवलतीचे इंधन पुरविले जाऊ नये, असे मत्स्य व्यवसाय विभागाकडून कळवले जाणार आहे.

Fishing boat on beach
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ,भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

अशी होणार पडताळणी

अधिकृत मासेमारी नौकेची नोंदणी केलेली असते, त्याचा शासनमान्य परवाना असतो. ज्या मासेमारी पद्धतीचा परवाना मासेमरांकडे असतो त्याच जाळ्याने किंवा साधनांनी कायदेशीर मासेमारी करता येते. नमुना 5 हे बंदर नोंदणीपत्र यासाठी आवश्यक असते. म्हणून नौकेचा विमा काढणे बंधनकारकर असते. नौकांवरील खलाशी, तांडेल यांचीसुद्धा माहिती रेकॉर्डला असणे आवश्यक असते. तसेच या माहितीबरोबर नौकांवरील खलाशी आणि तांडेलांचे आयकार्डसुद्धा असावे लागते. या सर्व प्रकारच्या कायदेशीर नोंदी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडे कराव्या लागतात. त्यानुसारच सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून मासेमारीची परवानगी दिली जाते. याच सर्व नोंदी, बंदर आणि जेटींवर उभ्या असलेल्या सर्व नौकांच्या नाव आणि नंबरची पडताळणी केली जाणार आहे. अशी माहिती भादुले यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com