Himanta Biswa Dainik Gomantak
महाराष्ट्र

''उद्धव ठाकरे सुट्टी घालवण्यासाठी आसाममध्ये या''

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी उद्धव ठाकरे यांना दिले निमंत्रण

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा अद्याप सुरु आहे. शिवसेनेचा 40 आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत आसाममध्ये स्थिरावला आहे. यामूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांना परत येण्यासाठी भावनिक साद घातली आहे. अशी स्थिती असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी उद्धव ठाकरेंना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही सुट्टी घालवण्यासाठी आसाममध्ये या तुमचे मी स्वागत करतो. (cm himanta biswa invited uddhav thackeray to come to assam and spend holidays )

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मेजवानी दिली. तसेच महाराष्ट्रातील सरकार पडल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण कोणालाही आसाम राज्यात येण्यापासून रोखू शकत नाही, तसेच मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल माहीत नाही, पण ते किती ही दिवस असले तरी ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. असं ही ते यावेळी म्हणाले.

काय आहे अडचण बंडखोर आमदारांची ?

आसाममधील या हॉटेलमध्ये राहणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, शिवसेनेने आपल्या विचारसरणीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. हे सरकार भ्रष्टाचारात बुडाल्याने शिवसेनेच्या सरकारने या युतीतून बाहेर पडावे, असे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे येथील सरकार पाडण्यासाठी आमदारांना एकत्र करत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आपल्या आमदारांना जबरदस्तीने हॉटेल्स आणि ऑपरेशन लोटलमध्ये कैद केल्याचा आरोप केला. यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT