Maharashtra Crisis: ठाकरे अन् शिंदे यांच्याकडे हे संविधानिक पर्याय उपलब्ध

महाविकास आघाडी सरकारवरील राजकीय संकटादरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत काळसे यांनी माध्यमाशी संवाद साधला.
Uddhav Thackeray And Eknath Shinde
Uddhav Thackeray And Eknath ShindeDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारवरील राजकीय संकटादरम्यान महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत काळसे यांनी माध्यमाशी संवाद साधला. या राजकीय पेचप्रसंगाचे किती पैलू असू शकतात आणि दोन्ही गटांसाठी काय पर्याय असू शकतात हे जाणून घेऊया... (Uddhav Thackeray and Eknath Shinde have these options during the political crisis in Maharashtra)

काळसे म्हणाले की, 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोर आमदारांसाठी पहिला आणि सोपा मार्ग म्हणजे राज्यपालांना पत्र देऊन सरकारविरोधात अविश्वास ठराव आणणे आणि विधानसभेत बहुमत सिद्ध करणे. दुसरा मार्ग म्हणजे निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणे आणि आपल्या विधीमंडळ पक्षाला मान्यता मिळवणे, परंतु हे खूप किचकट काम आहे आणि त्यासाठी खूप वेळ लागू शकतो.'

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Maharashtra Crisis: 'शिंदे साहेब घरी परत या', शिवसैनिकाची आर्त हाक

आमदार बरखास्तीवर काय होणार?

बारा आमदारांच्या बरखास्तीचे प्रकरण उपसभापतींकडे आहे, मात्र त्यासाठी त्यांना आधी सर्व कागदपत्रे मागवावी लागणार आहेत. सर्व 12 आमदारांना नोटीस द्यावी लागणार आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर निर्णय घ्यावा लागेल. मात्र यामध्ये एक पैलू असा आहे की, मुख्य व्हीप हा विधानसभेच्या अधिवेशनासाठीच लागू असतो, त्यानंतर उपसभापतींच्या निर्णयानंतर न्यायालयात (Court) जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जोपर्यंत हे प्रकरण उपसभापतींकडे प्रलंबित आहे, तोपर्यंत सर्व 12 आमदार कायम राहतील. म्हणजे त्यांचा मतदानाचा हक्क राहील. त्यामुळेच सध्या हा मोठा अडथळा नाही. आता मुख्य व्हीप आणि विधिमंडळ पक्षनेते बदलण्याचा मुद्दा आहे, त्यामुळे जोपर्यंत बंडखोर आमदारांना (MLA) निवडणूक आयोगाची मान्यता मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या बहुमताला काही अर्थ नाही.

Uddhav Thackeray And Eknath Shinde
Maharashtra Crisis: अरं बाबवं! बंडखोर आमदारांचा खर्च लाखोंमध्ये, जाणून घ्या

पोलिस आयुक्त संजय पांडे मातोश्रीवर पोहोचले

महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संजय पांडे मातोश्रीवर पोहोचले असून त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. 6 दिवसांनंतर 30 जून रोजी संजय पांडे निवृत्त होत आहेत. अशा वेळी नवीन पोलीस आयुक्तांची निवड करावी लागेल. पुढील पोलिस आयुक्तही एमव्हीए सरकारनेच निवडावेत, अशी ठाकरे सरकारची इच्छा आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असतानाच संजय पांडे यांनी कोरोनाचे कारण देत उमंगचा कार्यक्रम रद्द केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com