BJP MLA Ganpat Gaikwad Fired at Shiv Sena Leader Mahesh Gaikwad 
महाराष्ट्र

BJP MLA Firing: पोलीस ठाण्यातच राडा! भाजप आमदाराने शिवसेना नेत्यावर झाडल्या गोळ्या

Ashutosh Masgaunde

BJP MLA Ganpat Gaikwad fired bullets at Shiv Sena leader Mahesh Gaikwad in the police station in Ulhasnagar Thane:

भाजपच्या एका आमदाराने शिवसेनेच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात शिवसेना नेते महेश गायकवाड यांना चार गोळ्या लागल्या. यासोबतच आणखी एक नेते राहुल पाटील हेही गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही नेत्यांवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. यासोबतच ही संपूर्ण घटना उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.

महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. काही वादातून दोघेही हिल लाईन पोलिस ठाणे गाठले होते आणि संभाषण सुरू असताना गणपत गायकवाड यांनी महेश यांच्यावर चार गोळ्या झाडल्या.

या घटनेनंतर जखमी शिवसेना नेते महेश यांना उल्हासनगर येथील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रात्री ११ वाजता ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच महेश गायकवाड यांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. आता संपूर्ण रुग्णालय समर्थकांनी भरून गेल्याची स्थिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीच्या वादातून वाद सुरू होता. या वादामुळे दोन्ही नेते व त्यांचे समर्थक हिल लाईन पोलीस ठाण्यात जमा झाले होते.

दरम्यान, दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT