Maharashtra Horror: पॉर्न फिल्म्स पाहिल्याने बापानेच केली मुलाची हत्या; महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकार

Maharashtra Crime: इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांना नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
Crime news
Crime newsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Maharashtra Horror: महाराष्ट्रातील सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बापानेच आपल्या 14 वर्षांच्या मुलाची विष पाजून हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कारण तो वर्गात खोडसाळपणा करतो, मोबाईलवर ब्लू फिल्म पाहतो आणि त्याचं वागणंही खूप वाईट असल्याची तक्रार त्याच्या शाळेतून आली होती. यामुळे संतापलेल्या बापाने हे पाऊल उचलले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांना नाल्यात कुजलेल्या अवस्थेत मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलाच्या बापाचा शोध घेतला, ज्याने 13 जानेवारी रोजी आपल्या मुलासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली होती, त्याच दिवशी त्याने त्याची हत्या केली होती.

पॉर्न फिल्म्स पाहिल्याबद्दल बापाने मुलाची हत्या केली

दरम्यान, पोलिसांनी विजय आणि त्याचे कुटुंबीय त्याचबरोबर शेजाऱ्यांची चौकशी केली असता त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आली. विजयने मुलाचा मृतदेह नाल्यात टाकण्यापूर्वी त्याचा हात कापण्यासाठी वापरलेला चाकूही त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. फिंगरप्रिंट्स किंवा डीएनएद्वारे मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून विजयने आपल्या मुलाचा हात कापला होता.

Crime news
Maharashtra-Goa Crime: गोव्यात वास्तव्य, महाराष्ट्रात चोरी! 21 वर्षांचा अट्टल गुन्हेगार असा सापडला पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, विजयच्या बायकोने नवऱ्याच्या कबुलीजबाबाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विजयला अटक करुन 29 जानेवारी रोजी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी त्याच्यावर खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Indian Expat Murdered In Sharjah UAE
Mahabharat Actor Saurav Gurjar Arrested
Guwahati Crime News
Maharashtra Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com