Baramati Plane Crash Dainik Gomantak
महाराष्ट्र

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान अपघात! पायलट ट्रेनिंग सुरु असताना शेतात कोसळलं; सुदैवानं जीवितहानी टळली

Trainer Aircraft Crash Landing Baramati: बुधवारी (13 मे) सकाळी रेडबर्ड कंपनीचे एक ट्रेनर विमान बारामती विमानतळाजवळ असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत कोसळले.

Manish Jadhav

Baramati Plane Crash: बारामतीमधून विमान अपघाताची एक मोठी बातमी समोर आली. बुधवारी (13 मे) सकाळी रेडबर्ड कंपनीचे एक ट्रेनर विमान बारामती विमानतळाजवळ असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत कोसळले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असली, तरी सुदैवाने विमानातील शिकाऊ पायलट या घटनेतून सुखरुप बाहेर पडला. विमानाचे 'क्रॅश लँडिंग' होत असताना ते जमिनीवर आदळण्यापूर्वी विजेच्या खांबाला धडकले, ज्यामुळे विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास घडली. रेडबर्ड एअरलाईन्सच्या या विमानाने सरावासाठी उड्डाण केले होते, मात्र हवेत असतानाच विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमानावरचे नियंत्रण सुटू लागल्याने पायलटने ते सुरक्षितरीत्या उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान अत्यंत कमी उंचीवरुन उडत होते, मात्र अचानक खाली येऊ लागले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमानाचा एक भाग शेतातील विजेच्या खांबाला जोरात धडकला आणि त्यानंतर विमान शेतात कोसळले.

अपघाताच्या (Accident) वेळी विमानात केवळ एकच शिकाऊ पायलट होता. विमान जमिनीवर आदळल्यानंतर हा पायलट सुदैवाने कोणत्याही गंभीर दुखापतीशिवाय बाहेर पडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, ही सर्वात मोठी समाधानाची बाब ठरली.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु केली. विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता आणि अपघाताची इतर तांत्रिक कारणे काय होती, याचा तपास नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून केला जाण्याची शक्यता आहे. बारामती परिसरात प्रशिक्षण विमानांचे उड्डाण सातत्याने सुरु असते, मात्र अशा प्रकारच्या अपघातामुळे प्रशिक्षण विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT