Balasaheb Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

... 'तर बाळासाहेब ठाकरेंनी नकली हिंदुत्ववाद्यांचे मुखवटे ओरबडून काढले असते '

त्रिपुरातील (Tripura) घटनेवरुन महाराष्ट्र बंद करणे योग्य नाही. याचा गैरफायदा नकली हिंदुत्ववाद्यांना घेऊन अमरावती पेटवली.

दैनिक गोमन्तक

मुंबई: देशातील स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्रवीर सगळे सारखेच आहेत. असे संबोधणाऱ्यांची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना जमिनीत गाडले असते. बाळासाहेब ठाकरे यांचा आज पुण्यस्मरण दिन आहे. या दिनानिमित्त, बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आज असते तर त्यांनी काय केले असते असा उल्लेख सामनाच्या अग्रलेखात केला आहे.

अभिनेत्री कंगनाने (Actress Kangana) स्वातंत्र्यावरून वक्तव्य केले होते. यावर वाद सुरु असतानाच अभिनेते विक्रम गोखलेनी मात्र याचे समर्थन केले होते. अवधूत गुप्तेसारखे अप्रत्यक्षपणे गोखले यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या सर्वांबद्दल अग्रलेख लिहिले आहे, स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जातोय.

1947 साली मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही. तर खऱे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार झाला आहे. तसेच 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी यांनी काहीच केले नाही, असे काही लोक बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंगांपासून ते चाफेकर बंधूंपर्यंत सगळेच एकसारखे आहेत. असे बोलणाऱ्यांची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना जमिनीत गाडून टाकले असते असे सामन्याच्या अग्रलेखात लागण्यात आले आहे.

खोट्या गोष्टीने अमरावती पेटवली

महाराष्ट्राच्या चार शहरात दंगल झाली. अमरावतीत (Amravati) तर अद्यापही संचारबंदी सुरु आहे. सामानाने आजच्या अग्रलेखात त्याबाबतही लिहिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यात कथित हिंदू समाजातील लोकांनी आंदोलन केले.

त्यामुळे मुंबईमध्ये (Mumbai) रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या गेल्यात. यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. परंतु त्या बंदचे पडसाद फक्त अमरावतीमध्ये झाले. यातून हिंसाचार घडून आणला. रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करणे हे यांच्याकडून केले जाणार नाही. तरी त्रिपुरातील (Tripura) घटनेवरुन महाराष्ट्र बंद करणे योग्य नाही. याचा गैरफायदा नकली हिंदुत्ववाद्यांना घेऊन अमरावती पेटवली. पण आज बाळासाहेब असते तर असे करण्याची कोणाची हिंमत झाली नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून काढले असते. असे सामन्याच्या अग्रलेखात लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; कॉंग्रेस आमदारांचे ‘पोस्ट लंच'' उपोषण

'हे महात्मा गांधीजी यांचा वारसा पुसून टाकण्याचे षडयंत्र'! ‘मनरेगा’ पुनर्स्थापित करण्याची काँग्रेसची मागणी; लोहिया मैदानावर उपोषण

Goa Crime: गोव्याच्या व्यावसायिकाला 'मिरची' झोंबली! दुबईत निर्यातीच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक, पुण्यातील एकावर गुन्हा दाखल

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

बर्च प्रकरणानंतर झारखंडला पळून गेलेला संशयित सापडला, महिन्यानंतर ‘ऑपरेशनल मॅनेजर’ ताब्यात; महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT