कंगनाने (Kangana) केलेल्या टीकेला उत्तर देत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला. कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, असे कंगनाने म्हटले आहे. तसेच 1947 मध्ये भीक मागण्यात स्वातंत्र्य मिळाले. परंतु खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले. असे कंगनाने म्हटले आहे.
यावर प्रतिउत्तर देत संजय राऊत म्हणाले, चीन आमच्या सीमेत घुसत आहे. आपण काय करत आहेत? हे केंद्रातील मोदी सरकारचे गाल फिरवण्यासारखे आहे. काश्मीरमध्ये (Kashmir) पंडित मारले जात आहेत. हे सगळं या मॅडमला कळायला हवे. अशी काही मते असू शकतात ज्यावर आपल्यात मतभेद असू शकतात. बाळासाहेबांनीही (Balasaheb) त्यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. परंतु स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची प्रमुख भूमिका कोणीही नाकारू शकत नाही. महात्मा गांधी जगाचे महानायक होते आणि आहेत. मोदीजीही राजघाटावर जाऊन पुष्प अर्पण करतात, जगावर आणि देशावर आजही गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव आहे, आणि राहील.
'देशाला धोका खोट्या हिंदुत्ववाद्यांपासून
काल झालेल्या महाराष्ट्र भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करताना अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचार हा जाणीवपूर्वक केलेला प्रयोग असल्याचे म्हटले होते. ठाकरे सरकार यात सहभागी आहे. हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. मात्र शिवसेना अजान करण्याच्या शर्यतीत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची शिवसेना उरली नसल्याचे सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, 24 कॅरेटची शिवसेना राहिली नाही.
या सगळ्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, 'देशाला खरा धोका बनावट हिंदुत्ववाद्यांपासून आहे. हे लोक निवडणुकीला आले की कुठेतरी दंगल घडवून आणण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे वातावरण तयार केले जाते.
प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्री
या राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही, हे माहीतीच नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले. मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य स्वतःला मुख्यमंत्री (CM) समजतो. मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, होय, या राज्यातील प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्री आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मी मुख्यमंत्री आहे, असे वाटत, त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्री आणि आमदारालाही आपण मुख्यमंत्री असल्याचे वाटले पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. आणि हा लोकशाहीचा विजय झाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला वाटत नाही की मी मंत्री आहे, तर एकाही खासदाराला वाटत नाही की मी खासदार आहे. असे संजय राऊत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.