Ashadhi Ekadashi  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Ashadhi Ekadashi: टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरण्या उरकून अनेकांनी पंढरीची वाट धरली.

Sameer Panditrao

पंढरपूर: ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी!’ हा आत्मानंद सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पेरण्या उरकून अनेकांनी पंढरीची वाट धरली.

सर्वच पालखी सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या अधिक पाहायला मिळाली. पंढरपूरमध्ये विक्रमी सुमारे बारा ते पंधरा लाख भाविक आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० जन्मोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत आहे. त्यामुळे माउलींच्या सोहळ्यात वारकऱ्यांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत दीड ते दोन पट अधिक होती.

तसेच संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा असल्याने त्याही सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. सर्वच संतांच्या पालख्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पालखी सोहळे पंढरीत दाखल होऊ लागलेत.

दर्शनरांग गोपाळपुरापुढे

चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुंडलिक मंदिर, नामदेव पायरी, कळस दर्शन करून काही भाविकांनी पंढरीत मुक्काम केला आहे. आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे. विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपुरापुढे गेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव यांचे पालखी सोहळे दाखल झाल्यानंतर गर्दी वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; अबब! 50 कोटींचा खर्च वायफळ

New Borim Bridge: नवीन बोरी पुलासाठी 1000 कोटींचा आराखडा! अडीच वर्षांत काम होणार पूर्ण; ढवळीतून निघणार बगलरस्ता

SCROLL FOR NEXT