Anil Parab Dainik Gomantak
महाराष्ट्र

सिल्वर ओकवरील हल्लेखोर कर्मचाऱ्यांना अनिल परबांकडून घरचा रस्ता

शरद पवार यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेत वाढ

दैनिक गोमन्तक

मुंबई: आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या अंदोलना दरम्यान आंदोलकांनी घरावर तुफान दगडफेक तसेच चप्पल चप्पल फेक करत राडा घातला.(Anil parab warns protesters in front of Sharad Pawar's house not to hire them again)

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक करण्यात आली असुन तब्बल 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ते म्हणाले "येत्या 22 तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत तसेच 22 एप्रिल पर्यंत जे कामगार कामावर रुजू होणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच दिलेल्या मुदतीपर्यंत कामावर हजर राहिल्यास त्या कर्मचार्‍याला कोणत्याही कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.

एसटीमध्ये कंत्राटी खाजगीकरण करण्याचा मुद्दा

अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 तारखेपर्यंत कामावर रुजू न झालेल्या कर्मचार्‍यांना सेवेत घेता येणे शक्य नाही; असाही इशारा त्यांनी दिला ते पुढे म्हणाले 22 तारखेपर्यंत कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर एसटीमध्ये कंत्राटी खाजगीकरण करता येईल का यावर विचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

SCROLL FOR NEXT