INS Vikrant: भाजप नेते किरीट सोमय्या यांची अटकपूर्व जामीन याचिका दाखल

किरीट सोमय्या यांनी 11 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. 2013-14 मध्ये आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल
Kirit Somaiya
Kirit SomaiyaDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 11 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली आहे. सोमय्या आणि त्यांच्या मुलावर 2013-14 मध्ये आयएनएस विक्रांतच्या बचावाच्या मोहिमेदरम्यान जमा झालेल्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आज त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. (BJP leader Kirit Somaiya's pre-arrest bail petition filed in INS vikrant Case)

Kirit Somaiya
काही पक्षांमध्ये अल्प बुध्दीचे लोक असतात...: देवेंद्र फडणवीस

आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे

या प्रकरणी किरीट सोमय्या म्हणाले होते की, तक्रारदाराने कोणताही पुरावा सादर केलेला नाही, तरीही मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. संजय राऊत यांनी याआधी 17 प्रकारचे आरोप केले आहेत पण एकही पुरावा ते सादर करू शकलेले नाहीत.

आयएनएस विक्रांत प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दोन दिवसांपूर्वी आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला होता.

Kirit Somaiya
मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार वसंत मोरेंची भेट

420 आणि इतर कलमांखाली एफआयआर नोंदवला

ही रक्कम ५७ कोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले होते की, 2013 साली झालेल्या 35 मिनिटांच्या आंदोलनात एवढी मोठी रक्कम कशी जमा होऊ शकते? प्रतिकात्मक पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

आयएनएस विक्रांत प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आणि चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात 420 आणि इतर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com