Ajit Pawar |Maharashtra Politics | Maha Morch | Mahavikas Aghadi Maha Morch | Mahavikas Aghadi Morch Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आरोपांचं राजकारण करण्यापेक्षा... छत्रपती संभाजीनगरमधील राड्यानंतर अजित पवार संतापले

Maharashtra Politics: आत्ता प्रश्न मोदींची डिग्री नसून महागाई आणि बेरोजगारी आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत रामनवमीच्या दिवशी झालेल्या दोन गटातील वादाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या प्रकरणाच्या आरोपाचं राजकारण करण्यापेक्षा पोलिसांनी तपास करावा. चौकशीअंती जे गुन्हेगार असतील त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीमहाराजनगर मध्ये झालेल्या वज्रमूठ सभेबद्दलदेखील त्यांनी वक्तव्य केले आहे. आम्ही एकोप्याने राहत आहोच आणि एकजूट आहोत असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी त्यांची डिग्री बघून त्यांना पंतप्रधानपद दिले आहे का? 2014 मध्ये त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यत आपला करिश्मा निर्माण केला आणि त्याचे संपूर्ण श्रेय त्यांना आणि भाजप पक्षाला जाते.

कोणतीतरी डिग्री असल्याशिवाय पंतप्रधान होता येत नाही का गेल्या 8-9 वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत.आत्ता प्रश्न मोदींची डिग्री नसून महागाई आणि बेरोजगारी आहे, त्याबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत, चर्चा केल्या पाहिजेत असे अजित पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, रामनवमीच्या दिवशी राज्याच्या विविध भागात विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद झालेला दिसून आला होता. दोन गटात दगडफेक झाल्याचाप्रकारही समोर आला होता. या वादानंतर राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले होते.

सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाचा यामध्ये हात असल्याचे म्हटले होते तर विरोधी पक्षाने राज्य सरकारला शांतता ठेवण्यास अपयश आल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्या जबाबदारीमध्ये फेल झाले असून त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

आता अजित पवारांनी यावर बोलताना म्हटले आहे की, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावे घेण्यापेक्षा पोलिस यंत्रणेने चौकशी करुन सत्य समोर आणावे.

रामनवमीदिवशी दंगल कोणी घडवली ? सूत्रदार कोण आहे? यावादापाठीमागे कोणाचे डोके आहे हे सर्व पोलिसांनी तपास करुन सर्वासमोर आणले पाहिजे. त्यामध्ये जे कोणीदोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे.

अजिबात त्यात कोणाची गय करु नका मात्र त्यात राजकीय हस्तक्षेपही होऊ देऊ नका असेही अजित पवारांनी म्हटले आहे.आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT