Virdi Dam Dispute: गोव्याचे पाणी महाराष्ट्र पळवणार? नेमका वाद जाणून घ्या

विर्डी धरण कामाबाबत कोणतेच कायदेशीर परवाने घेतले नसल्याचा पर्यावरणतज्ञांचा आरोप
Virdi Dam
Virdi Dam Dainik Gomantak
Published on
Updated on

Virdi Dam Dispute

गोव्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटक सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत असून हे कमी की काय म्हणून आता महाराष्ट्र सरकारने देखील हे पाणी वळवण्यासाठी विर्डी धरणाचे काम सुरु केलेय. विर्डी धरणाचे काम बेकायदेशीर असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी केला.

पर्यावरणतज्ञांचे मत:-

एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना राजेंद्र केरकर असे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने दोडामार्ग येथे विर्डी धरणाचे काम सुरू केलेय मात्र याकरिता त्यांनी कोणतेच कायदेशीर परवाने घेतलेले नाहीत.

या संदर्भात तेथील कंत्राटदाराला विचारले असता त्याने ओरोस येथील कार्यकारी अभियंत्यांकडून या बाबत परवानगी मिळाली असून त्यांच्या आदेशानुसारच काम सुरु करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. हा विषय पूर्णतः बेकायदेशीर असून गोवा सरकारने या पूर्वी म्हादई पाणी वाटप लवाद यांच्याकडे नेला आहे.

त्याशिवाय गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांनी या विषयाबाबतच्या याचिका दाखल केल्या असून अद्याप या याचिकांबाबत कोणताही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही, असं असतानाही महाराष्ट्र सरकारने हे काम सुरु केले आहे.

हा पूर्ण परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून या कामाबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे मत केरकर यांनी व्यक्त केलेय.

नक्की वाद काय?

विर्डी महाराष्ट्राचा लघुपाटबंधारे प्रकल्प असून तो वाळवंटी नदीवर प्रस्तावित आहे. पर्यावरणदृष्ट्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत गोव्याने विर्डी प्रकल्पाला विरोध केलाय. वाळवंटी नदीवर धरण झाल्यास गोव्याला जाणारे पाणी अडविले जाईल याच कारणास्तव हा विरोध केला जातोय.

Virdi Dam
Fire In Goa: गोव्यात पुन्हा आगीचे सत्र सुरू, शिवोली येथे वडाच्या झाडाला आग

धरण झाल्यास गोव्यावर काय परिणाम होईल?

सध्या कर्नाटक सरकार म्हादईचे पाणी वळवण्यास प्रयत्नशील असून महाराष्ट्र-दोडामार्गमधील विर्डी धरण झाल्यास गोव्याला नक्कीच पाणी टंचाई भासणार आहे, असे मत पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केलेय.

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्यास सत्तरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असून दाबोस पाणी प्रकल्पावर परिणाम होणार आहे. जलसाठ्यावर मर्यादा येईल, त्यामुळे सत्तरी तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे.

Virdi Dam
Yuri Alemao: गोव्यातील कलाकारांना सरकारी नोकरी, विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स द्या - युरी आलेमाव

प्रकल्पाबाबत महाराष्ट्राची भूमिका काय?

महाराष्ट्रातील दोडामार्ग हा भाग शेती, बागायती आणि पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध समजला जातो. तसेच महाराष्ट्राला लागणाऱ्या पाणी साठ्याची उपलब्धता या प्रकल्पामुळे भागवली जाणार आहे. थोडक्यात तिलारी नंतर विर्डी हा प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

Virdi Dam
Goa Traffic Police: वाहनचालकांच्या 'या' कृतीविरोधात काणकोण ट्राफिक पोलिस अ‍ॅक्शन मोडवर, वाचा सविस्तर

विर्डी बाबत गोव्यातील नेत्यांची प्रतिक्रिया:-

म्हादईच्या पाणी मुद्द्यावरून गोव्यातील विरोधी पक्षाने अक्षरशः एल्गार पुकारलाय. गोव्यातील विविध संघटनांनी देखील कर्नाटकला पाणी देऊ नये यासाठी मोर्चे- आंदोलनं केली आहेत आणि आता महाराष्ट्रात विर्डी धरणाचे काम सुरु झाल्याने विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

"महाराष्ट्रात विर्डी धरणाचे बेकायदा काम सुरू करण्यासाठी भाजपचे चौथे इंजिन कार्यान्वित झाले आहे. भाजप सरकारच्या सुस्त आणि विश्वासघातकी वृत्तीमुळे आमची जीवनदायीनी आई म्हादईची हत्या झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आताच ताबडतोब कारवाई करून सदर काम बंद पाडावे अशी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com