maharashtra assembly session 2022  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री अधिवेशनात दाखल तर 5 मिनिटं बोलून राज्यपालांनी सोडलं सभागृह

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून गुरूवार सुरूवात झाली आहे. अधिवेशनात सरकारला वेठीस धरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत.

दैनिक गोमन्तक

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून गुरूवार सुरूवात झाली आहे. अधिवेशनात सरकारला वेठीस धरण्यासाठी विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत. सरकार-विरोधक यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटू शकतो. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमची फैज तयार आहे, असे काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चहापानाच्या वेळेस माध्यमांना सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती झालेल्या शस्त्रक्रियेनंतर या अधिवेशनात ते प्रथमच सर्वांसमोर येणार आहेत. (maharashtra assembly session 2022 live)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) सभागृह परिसरात दाखल झाले असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ते सभागृहाकडे रवाना झाले आहेत. ''काही दिवसांपूर्वीच त्यांनी, मी अधिवेशनात उपस्थिती लावणार आहे आणि त्यानंतर दररोज मंत्रालयातही हजेरी लावणार आहे,'' असे वक्तवंही केले हाते. त्यामुळे ते प्रत्यक्ष अधिवेशनात येणार का आणि विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरं देणार याकडे राष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi) स्थापन झाल्यापासून भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वादाचे रुपांतर मोठ्या संघर्षात होताना आपणं पाहिले आहे. आधिवेळन चालू होण्यापुर्वीचं दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवरती टीकास्त्र सोडत आहेत. केंद्रीची सरकार आणि राज्याची सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातुन एकमेकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. याचे पडसाद ही या अधिवेशनात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि केंद्र सरकारवरती घणाघाती टीका केली आहे. भाजपचा उल्लेख सापाचं पिल्लू असा करत या सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते वळवळ करतंय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

याच अधिवेशनात 2022-23 साठीचा अर्थसंकल्प मांडला जाईल. हा अर्थसंकल्प 11 मार्च (शुक्रवार) रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली आहे. एकीकडे महागाईचा भडका उडत आहे तर अशावेळी राज्य सरकार जनतेला कशाप्रकारे दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे राज्यातील अवघ्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

अधिवेशनाच्या कामकाजात प्रामुख्याने राज्यपालांचे अभिभाषण, राज्यपालांच्या भाषणावर अभिनंदनाचा ठराव आणि भाषणावर चर्चा असा पहिल्या दोन दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. यंदाचे अधिवेशन हे ठाकरे सरकारच्या काळातील सर्वाधिक कालावधीचे आहे. यंदा 3 मार्च ते 24 मार्च या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे.

राज्यपालांना त्यांच्या, शिवाजी महाराजांविषयीच्या वक्तव्यावरती माफी मागवीच लागेल, तसेच त्यांना परत पाठवण्याचा प्रस्ताव आणण्यावर विचार सुरु असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्याण पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी देखील सुरु आहे.

सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारची, भाजप आमदार आशिष शेलार यांची टीका आहे. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचाही भाजपने इशारा केला आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सभागृहात गोंधळ; तर राज्यपालांचे भाषणही थांबवले गेले आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध करत सभागृह आक्रमक झाला आहे. राज्यपाल सभागृह परिसरातून निघून गेले आहेत. कदाचित राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल यांनी अभिभाषण केवळ 5 मिनिटात संपवले आणि सभागृह सोडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT